AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छावा चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीत युवकाने केला जोरदार हंगामा, अकबर-हुमायूं रोडवर…

chhaava movie: संभाजी महाराजांवर क्रूरपणे औरंगजेबने केलेले अत्याचार पहिल्यावर युवा पिढी संतप्त होत आहे. त्याचे पडसाद देशभरात दिसत आहे. दिल्लीतही काही तरुणांनी अकबर रोड आणि हुमायूं रोडवर फलकांवर काळे फासले.

छावा चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीत युवकाने केला जोरदार हंगामा, अकबर-हुमायूं रोडवर...
दिल्लीत काळे फासले
| Updated on: Mar 17, 2025 | 3:01 PM
Share

chhaava movie: छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगभरातील लोकांपुढे आला आहे. औरंगजेबसारख्या क्रूरकर्मासोबत संभाजी महाराजांनी दिलेला लढा चित्रपटामुळे युवा पिढीसमोर आला. चित्रपट पाहिल्यानंतर औरंगजेबविरोधात प्रचंड संताप युवकांमध्ये निर्माण होत आहे. विकी कौशल यांचा छावा पहिल्यानंतर काही युवकांनी दिल्लीत जोरदार हंगामा केला. दिल्लीतील अकबर रोड आणि हुमायूं रोडवर जावून त्या बोर्डांना काळे फासले. या रस्त्यांची नावे बदलण्याची मागणी केली. मुघल शासकांचा इतिहास शिकवण्याऐवजी शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचा इतिहास शिकवण्याची मागणी केली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फलकांवर काळे फासले

छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य छावा चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. संभाजी महाराज यांना साम, दाम, दंड, भेद अशा विविध पद्धतीने औरंगजेबसमोर झुकवण्याचा प्रयत्न केला. परंतु संभाजी महाराज समोर प्रत्येक क्षणी औरंगजेब पराभूत होत राहिला. संभाजी महाराजांवर क्रूरपणे औरंगजेबने केलेले अत्याचार पहिल्यावर युवा पिढी संतप्त होत आहे. त्याचे पडसाद देशभरात दिसत आहे. दिल्लीतही काही तरुणांनी अकबर रोड आणि हुमायूं रोडवर फलकांवर काळे फासले. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा फोटो लावले. संभाजी महाराज यांचा जयजयकार केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरु

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथके आणि दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी खराब झालेले फलक स्वच्छ केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी त्या युवकांचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दिल्ली पोलीस कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये छावा चित्रपट पाहताना एक युवक संतापला होता. तो आपण चित्रपट पाहत असल्याचे विसरला. त्याने सिनेमागृहाच्या पडद्याकडे धाव घेत पडदा फाडून टाकला. देशभरातील युवकांपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास गेला नव्हता. तो आता चित्रपटाच्या माध्यमातून गेल्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.