वाघनखांचा इतिहास अन् सातारा ते लंडन प्रवासाची रंजक कथा
वाघनखे नेमकी असतात कशी? त्याचा वापर कधीपासून सुरु झाला? अफजलखान भेटीसाठी शिवाजी महाराजांनी वाघनखेच का वापरली? शिवकालीन वाघनखे लंडनमध्ये कशी गेली? वाघनखांसंदर्भात विविध इतिहास संशोधक काय म्हणतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात मराठी माणसालाच नाही तर देशातील प्रत्येकाला कुतूहल आहे. त्यांच्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची उत्कंठा आहे. त्यामुळेच महाराजांवरील अनेक पुस्तके जिज्ञासू पालथी घालत असतात. गडकिल्ल्यांवर भटकंती करत असतात. मोजक्या सैन्यांसह महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य म्हणजे जगातील सर्वांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यांच्या समोर अनेक प्रबळ शत्रू असताना महाराजांनी सर्वांना नामोहरण करुन ठेवले होते. यामुळे शेकडो वर्षानंतरही आजही शिवाजी महाराजांची युद्धनीती त्यांनी उभारलेले आरमार हे संशोधनाचा विषय ठरत आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनात त्यांच्यासमोर नेहमीच संकटांची मालिका होती. परंतु त्यातून ते आपल्या बुद्धिमत्ता आणि चातुर्यामुळे बाहेर पडत राहिले. शिवाजी महाराजांची आग्रातून सुटका आणि अफजलखानसारख्या बलाढ्य शूत्रचा पराभव हे महाराजांच्या जीवनातील सर्वात आव्हानाचे क्षण म्हटले जातात. अफजलखानसारख्या शत्रूला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखांसंदर्भात सर्वांना कुतूहल आणि उत्कंठा लागलेली असते. लंडनमधून शिवकालीन वाघनखे भारतात आली आहेत. आता तीन वर्षे वाघनखे राज्यात असणार आहेत. ही वाघनखे नेमकी असतात कशी? त्याचा वापर कधीपासून सुरु झाला? अफजलखान भेटीसाठी शिवाजी महाराजांनी वाघनखेच का वापरली?...