AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चौकशीत योग्य ती उत्तरे न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. आता अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात घेऊन जाणार आहेत. त्यानंतर पुढे तिथे त्यांची चौकशी होणार आहे.

मोठी बातमी: ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 21, 2024 | 9:26 PM
Share

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. याआधी ईडीकडून त्यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यानंतर लगेचच ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले होते. आप पक्षाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रात्रीच या प्रकरणात सुनावणी व्हावी अशी आपची मागणी आहे. पण रात्री सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उद्याच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचू दिले जात नाहीये. पोलिसांनी आधीच निवासस्थानापासून दूरवर बॅरिकेड्स लावले आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आज ईडीचे पथक दहावे समन्स घेऊन त्यांच्या घरी दाखल झाली होती. यावेळी त्यांच्यी घरी झडती देखील घेण्यात आली आहे. चौकशीदरम्यान केजरीवाल यांचा फोन देखील ईडीने ताब्यात घेतला होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. केजरीवाल यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर त्यांना अटक करण्यात आलीये. आता यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे.

Follow Us
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू