China Plane Crash : चीनचं बोईंग 737 विमान क्रॅश, जंगलात विमान जळून खाक, 133 प्रवाशांचं काय झालं?

चीनमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोईंग 737 विमान क्रॅश होऊन कोसळलं. यानंतर जंगलात विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे.

China Plane Crash : चीनचं बोईंग 737 विमान क्रॅश, जंगलात विमान जळून खाक, 133 प्रवाशांचं काय झालं?
चीनमध्ये विमान दुर्घटना 133 जण दगावल्याची भीतीImage Credit source: Twitter Video Snap
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 4:18 PM

China Plane Crash नवी दिल्ली : चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोईंग 737 विमान क्रॅश (Boeing737 crash ) होऊन कोसळलं. यानंतर जंगलात विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे. 133 प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. किती जणं दगावले आणि किती वाचले आहेत यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. विमान गुआंगशी या प्रांतात जंगलात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर जळून खाक झाल्याची माहिती आहे. विमानातून प्रवास करणारे 133 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

133  जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

चीन मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनमधील बोईंग 737 हे विमान 133 प्रवाशांना घेऊन जात असताना चीनच्या गुआंगशी इथं आज विमानाला अपघात झाला. या अपघातात 133 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अपघात झाल्यानंतर विमानाला भीषण आगल्याचं देखील समोर आलं आहे.

विमान कोसळल्यानंतर पेटलं यामुळं जंगलाला आग लागली

विमान कोसळल्यानंतर पेटलं, जंगलाला आग

रायटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चीनचं बोईंग 737 हे विमान Kunming येथून Guangzhou कडे जात होतं. हे विमान Guangxi या भागात कोसळलं आहे. यानंतर विमानानं पेट घेतला. विमान कोसळल्यानंतर पेट घेतल्यानंतर जंगल देखील पेटल्याचं समोर आलं आहे.

MU5735 या विमानानं दक्षिण पश्चिम चीन मधील युन्नान प्रांतातील Kunming शहरातील Changshui विमानतळावरुन 1.15 वाजता उड्डाण घेतलं होतं, तर ते 3 वाजेपर्यंत हे विमान Guandong प्रांतातील Guangzhou येथे पोहोचणार होतं. मात्र त्यापूर्वीच विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

विमान कोसळतानाचा व्हिडीओ:

वृत्तसंस्था Xinhua नं दिलेल्या माहितीनुसार बचावपथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं ते 6 वर्षांचं आहे. जून 2015 मध्ये या विमानाचा वापर करण्यास सुरुवात झाली होती. या विमानात 162 सीट होत्या. त्यापैकी 12 बिझनेस क्लास आणि 150 इकोनॉमी क्लासच्या होत्या.

इतर बातम्या:

Pune Metro cess| पुण्यात बांधकाम व्यवसायिकांसह, सर्वसामान्य नागरिक धास्तीत ; मेट्रो सेस लागणार का?

Process Industry: प्रक्रिया उद्योगातून लातूरात सोयाबीनचे मार्केट वाढणार, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.