सर्वात जवळचा मित्र चीननेच दिला पाकिस्तानला मोठा दगा; पाकवर आणली तोंड लपवण्याची वेळ

ज्या चीनला पाकिस्तान आपला सगळ्यात जवळचा मित्र मानतो त्याच चीनने आता पाकिस्तानचा विश्वास तोडला आहे. चीनमुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली आहे.

सर्वात जवळचा मित्र चीननेच दिला पाकिस्तानला मोठा दगा; पाकवर आणली तोंड लपवण्याची वेळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2025 | 9:20 PM

ज्या चीनला पाकिस्तान आपला सगळ्यात जवळचा मित्र मानतो त्याच चीनने आता पाकिस्तानचा विश्वास तोडला आहे. पाकिस्तान चीनचं कौतुक करताना कधीच थकत नाही, मात्र आज त्याच चीनमुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली आहे, भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला याचे पुरावे आता जगसमोर आले आहेत, आणि ते पुरावे देण्याचं काम चीनने केलं आहे.चीनी सॅटेलाईट कंपनी असलेल्या MizarVision कडून भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे छायाचित्र जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एअर बेसचं किती प्रंचड नुकसान झालं आहे, हे दिसून येत आहे.

सात मे रोजी भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला होता, 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर भारताकडून ऑपरेश सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये ही कारवाई करण्यात आली होती, भारताच्या या हल्ल्यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते, तसेच 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.

रावळपिंडीमध्ये असलेलं नूर खान एअर बेस हे पाकिस्तानी वायु सेनेचं सर्वात मोठं एअर बेस होतं. भारतानं पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यामध्ये नूर खान एअर बेस पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. एअर बेसची जागा एका खंडरानं घेतली आहे. तीथे फक्त मातीचे ढिग दिसून येत आहेत.मात्र तरी देखील पाकिस्तानकडून सातत्यानं असा दावा करण्यात येत होता की आमचं फार काही नुकसान झालेलं नाही, मात्र पाकिस्तानच्या या खोटेपणाचा पर्दाफाश पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र चीननेच केला आहे.

चीनी सॅटेलाइट कंपनी असलेल्या MizarVision कडून पाकिस्तानच्या नूर खान एअर बेसचं छायाचित्र जारी करण्यात आलं आहे, या छायाचित्रावरून भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची स्पष्ट कल्पना येते.दुसरीकडे भारतीय सॅटेलाईट कंपनी असलेल्या KAWASPACE कडून देखील या एअर बेसचं एक छायाचित्र जारी करण्यात आलं आहे. फक्त नुर खान एअर बेसच नाही तर बल्कि भोलारी आणि जॅकबाबाद एअर बेसच छायाचित्र देखील समोर आलं आहे.