AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एनडीएचेच मुख्यमंत्री राहा”, बिहारच्या युवा नेत्याचा नितीश कुमारांना चिमटा

लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांना सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. (Chirag Paswan congratulate and take jibe of Nitish Kumar)

सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत एनडीएचेच मुख्यमंत्री राहा, बिहारच्या युवा नेत्याचा नितीश कुमारांना चिमटा
| Updated on: Nov 16, 2020 | 8:23 PM
Share

पाटणा :लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांना सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. चिराग पासवान यांनी अभिनंदन करताना नितीश कुमारांच्या नेतृत्वातील सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. “नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदासाठी आणि नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवणाऱ्या भाजपचे अभिनंदन करतो”, असं तिरकस ट्विट केलं आहे. (Chirag Paswan congratulate and take jibe of Nitish Kumar)

चिराग पासवान यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत आपण एनडीएचेच मुख्यमंत्री असाल अशी आशा करतो, या शब्दांमध्ये चिराग पासवान यांनी नितीश कुमारांना चिमटा काढला आहे.

चार लाख बिहारच्या नागरिकांनी बनवलेले “बिहार फर्स्ट” व्हिजन डॉक्युमेंट आपणाला पाठवत आहे, असं चिराग पासवान म्हणाले. या डॉक्युमेंटमधील आपणास जी शक्य असतील ती विकासकामं आपण पूर्ण करावीत, अशी मागणी चिराग यांनी केली.

चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांचे अभिनंदन करताना भाजपलादेखील शुभेच्छा दिल्या आहेत. नितीश कुमारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपले अभिनंदन, असं चिराग पासवान म्हणाले. नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या इतर सर्व मंत्र्यांना चिराग पासवान यांनी शुभेच्छा दिल्या.

लोजपाचा 1 जागेवर विजय

चिराग पासवान यांच्या नेतृत्वात लोक जनशक्ती पार्टीनं विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. पासवान यांच्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार नितीश कुमारांच्या जदयू विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. लोक जनशक्ती पार्टीला बिहारमध्ये फक्त 1 जागेवर विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, आज नितीश कुमार यांच्य सह जदयूच्या 5 मंत्र्यानी, भाजपच्या 7 आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाकडून एक आणि विकासशील इन्सान पार्टीकडून 1 सदस्य यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

नितीशकुमार यांच्यासह जेडीयूकडून विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी आणि शीला कुमारी, भाजपकडून तारकिशोर प्रसाद, रेणू देवी, अमरेंद्र प्रतापसिंह, मंगल पाण्डेय, रामसूरत राय, रामप्रीत पासवान, जीवेश मिश्रा आणि ‘हम’कडून संतोष कुमाल सुमन तसेच मुकेश सहानी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहार भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

बिहारमध्ये पुन्हा नितीश’राज’!; नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar Oath LIVE | नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

(Chirag Paswan congratulate and take jibe of Nitish Kumar)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.