AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीची मोठी घोषणा, आता दिल्लीत आणखी मोठं आंदोलन, चार दिवसांचा प्लान….सरकारच्या अडचणी वाढणार?

दिल्लीत पोलिसांच्या कारवाईदरम्यान सीजेपीने मोठी घोषणा केली. आता दिल्लीत आणखी मोठं आंदोलन करणार असून त्यांनी चार दिवसांचा प्लान आखल्याचे त्यांनी सांगितले.

सीजेपीची मोठी घोषणा, आता दिल्लीत आणखी मोठं आंदोलन, चार दिवसांचा प्लान....सरकारच्या अडचणी वाढणार?
abhijeet dipke newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 6:13 PM
Share

दिल्लीत सीजेपी कार्यकर्त्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेसह शेकडो सीजेपी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपकेंनी सीजेपीची कमान अजिंक्य शिंदे यांच्यावर सोपवली. त्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. अभिजीत दिपकेंवर इमोशनल अत्याचार, छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.

अजिंक्य शिंदे म्हणाले, ‘सीजेपीच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना विमानातून ताब्यात घेण्यात आलं. यातून दिसून येत आहे की, मोदी सरकार घाबरलं आहे. नेहा बोरा सारखे नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मागील वेळी जंतरमंतरवर एकत्र येऊन मोदी सरकारला धक्का दिला होता. आता यंदा आंदोलनाची हाक देण्यात आली, यंदा ट्रेन, मेट्रो रोखण्यात आल्या.  दिल्लीला येणाऱ्या आंदोलकांना अर्ध्यात रोखण्यात आलं.  ट्रेन, बसमधून आंदोलकांना ताब्यात घेतलं. हवा आणि पाणी सोडून सर्वांना रोखलं आहे. परंतु आम्ही त्यांच्या हुकूमशाहीला घाबरणार नाहीत. खरंतर मोदी सरकार घाबरलं आहे. हाच आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय आहे. सरकारला वाटत असेल, की आंदोलन संपुष्टात येईल. परंतु हे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील’.

‘अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं आहे. त्यानंतरही पोलिसांनी अभिजीत यांच्याशी वकील आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी दिली नाही. पोलीस इमोशनल अत्याचार करत आहेत. विमानातून त्यांना ताब्यात घेतलं आहे.  रस्त्यावर ताब्यात घ्यायला हवं होतं. परंतु विमानातूनच ताब्यात घेत असाल, तर प्रवाशांनी प्रवास करणे सोडून द्यावे का.. त्यांच्यावर हा इमोशन अत्याचार केला जात आहे. तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहोत. ही एक दिवसांची लढाई नाही. चार दिवस असो पाच दिवस ही लढाई सुरू राहणार.  ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तर सरकार कोसळेल. त्यामुळे सरकार त्यांना वाचवण्यात येत आहे. अघोषित आणीबाणी केल्याने देशाची बदनामी होत आहे. ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, असे ते पुढे म्हणाले.

Follow Us
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता