Abhijeet Dipke: “हुकूमशाह ज्ञानूवर… “, जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंचा मोठा इशारा, पुढील अजेंडा काय?
Abhijeet Dipke on Gyanesh Kumar: "हुकूमशाह ज्ञानूवर आमचं सर्वाधिक प्रेम आहे", असे सांगत जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांनी मोठा इशारा दिला आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर बोचऱ्या शब्दात टीका केली.

Abhijeet Dipke on Gyanesh Kumar: “हुकूमशाह ज्ञानूवर आमचं सर्वाधिक प्रेम आहे”, असे सांगत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठा इशारा दिला आहे. 10 ऑक्टोबरपासून जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन होणार आहे. त्यापूर्वी INDIA आघाडीने काल दिल्लीत शक्तीप्रदर्शन दाखवले. तर आता तीन दिवसानंतर सीजेपीचे आंदोलन होत आहे. जंतरमंतर पुन्हा दणाणून सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपकेंसह टीम मैदानात उतरणार आहे. दरम्यान इंडिया आघाडीच्या मोर्चावेळी मोठा हायहोल्टेज ड्रामा दिसला. दिपके, सहसंयोजक आशुतोष रांका यांनी राहुल गांधींच्या अटकेवरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर बोचऱ्या शब्दात टीका केली.
“हुकूमशाह ज्ञानूवर आमचं सर्वाधिक प्रेम आहे”
“हुकूमशाह ज्ञानूवर आमचं सर्वाधिक प्रेम आहे” असल्याचे अभिजीत दिपके यांनी दिले. या वक्तव्यातून त्यांनी सीजेपी राजीनाम्यावर ठाम असल्याचे आणि जंतरमंतर नाही तर जिथं जागा मिळेल तिथंच जंतरमंतर करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सरकारसह निवडणूक आयोगाची चिंता वाढली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात अगोदर विद्यार्थ्यांवर कारवाई केली, नंतर पत्रकारांना ताब्यात घेतलं आणि आता लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यालाही, राहुल गांधी यांना ताब्यात घेतले जात आहे, असे ते म्हणाले. त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलनाची एकंदरीत स्क्रिप्ट तयार असल्याचेच सुतोवाच केले आहे.
राहुल गांधी यांना भेटण्यापासून का रोखले?
CJP चे संयोजक आशुतोष रांका यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांना भेटण्यापासून का रोखले जात आहे? निवडणूक आयोग ही खरोखरच स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था उरली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर आकाशवाणी भवन परिसरात राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे नेत झाडाखाली बसून धरणे करत असल्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला.
Why is BJP trying to stop the LOP from meeting the CEC and other ECs?
Isn’t Election Commission supposed to be an independent body? 🤔
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) October 6, 2026
तीन दिवसांनी दिल्लीत जंतरमंतर
काल इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले. त्यात राज्यसभा आणि लोकसभेतील खासदार सहभागी झाले होते. 19 घटक पक्षांचे नेते, खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरातील एका झाडाखालीच धरणे सुरू केले. आठ तास त्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत राहुल गांधींसह इतर नेत्यांना ताब्यात घेतले. आता तीन दिवसांनी दिल्लीत जंतरमंतरवर सीजेपी आंदोलनावर ठाम आहे.