AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे रद्द, मेट्रो बंद, दिल्ली हादरवायला निघालेल्या महाराष्ट्राच्या मुलाचे तिथे दाखल होण्याआधी महत्वाचे शब्द, जर तु्म्हाला एवढी भिती वाटते तर मग तुम्ही..

CJP Abhijeet Dipke : सध्या देशात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा आहे. उद्या सीजेपीने जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीला जात असताना वाटेत सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेने मीडियाशी संवाद साधला.

रेल्वे रद्द, मेट्रो बंद, दिल्ली हादरवायला निघालेल्या महाराष्ट्राच्या मुलाचे तिथे दाखल होण्याआधी महत्वाचे शब्द, जर तु्म्हाला एवढी भिती वाटते तर मग तुम्ही..
CJP Abhijeet Dipke
| Updated on: Oct 09, 2026 | 1:45 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने उद्या दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके ट्रेनने निघाले आहेत. वाटेत त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी आशुतोष राका आणि सौरव दास त्यांच्यासोबत होते. अभिजीत दीपकेने यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “एवढी भिती कशासाठी, जर तु्म्हाला एवढी भिती वाटते तर अख्खा देश बंद करुन टाका. मला हसू येतय. विशेष म्हणजे दिल्ली ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या घरची प्रॉपर्टी आहे का? आंदोलनामुळे त्रास होतो म्हणून मेट्रो बंद करता, रेल्वे बंद करता, रस्ते बंद करुन टाकले, आता लोकांना त्रास होणार नाही का?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.

“किती लोकांना ताब्यात घेणार? घ्या मला अटक करा. सौरव तयार आहे, आशुतोष तयार आहे, अटक करा आम्हाला. परवानगी, परवानगी काय? ज्ञानेश कुमारने 13 कोटी मतं डिलिट करताना परवानगी घेतली होती का? सुप्रीम कोर्टाने फॉर्म 6 मध्ये सुधारणांची परवानगी दिली होती का? ज्ञानेश कुमार कोणालाही न विचारता 13 कोटी मतं डिलिट करतो, मग त्याच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी परवानगीची गरज का आहे? संविधानाच्या आर्टिकल 19 ने आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली आहे. जंतर-मंतर हे आंदोलनाचं अधिकृत स्थळ आहे” असं अभिजीत दीपके म्हणाले.

पाकिस्तानातून मिळणाऱ्या पाठिंब्यावर अभिजीत दीपके काय म्हणाले?

“ते घाबरलेत म्हणून त्यांनी ट्रेन बंद केल्या आहेत, रेल्वे बंद केल्यात, ही काय कारण देतायत ते हुकूमशाह घाबरला आहे. सरकार गंभीर नाही असं कसं म्हणू शकता? म्हणूनच तर मेट्रो, रेल्वे बंद केली आहे. मी म्हणीन नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी रोज ब्लड प्रेशर चेक केला पाहिजे. त्यांना आंदोलनाची भिती वाटतेय. ज्ञानेश कुमार इतका महत्वाचा का आहे? राजाचा जीव पोपटात आहे, ज्ञानेश कुमार हा तो पोपट आहे, त्याला पकडलं तर राजा निघून जाईल” असा दावा ज्ञानेश कुमार यांनी केला. पाकिस्तानातून माहिरा खान आंदोलनाला सपोर्ट करतेय त्यावर दीपके म्हणाले की, “आमच्या देशातील जेन-झी भरपूर आहे. आम्हाला दुसऱ्या देशातून परवानगीची आवश्यकता नाही”

Follow Us
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद