CJP Jantar Mantar Protest: पोलीस केव्हा घेते ताब्यात आणि केव्हा करते अटक? काय आहेत नियम?
CJP Jantar Mantar Protest: आज दिल्लीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षही सहभागी होण्याची शक्यता आहे. पोलीस केव्हा घेते ताब्यात आणि केव्हा करते अटक? याविषयीचे काय आहेत नियम?

CJP Jantar Mantar Protest: 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शनापूर्वी आणि नंतर पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. दिल्लीत जंतर-मंतर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर अनेकांचा सहभाग आहे. त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. पण ताब्या घेणे आणि अटक करणे यामध्ये काय असते अंतर? पोलीस कशी करते ही कारवाई, काय आहेत याविषयीचा नियम?
ताब्यात घेते म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही तात्पुरती असते. त्याला तात्पुरते ताब्यात घेण्यात येते. सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आणि तपासासाठी पोलीस ही कारवाई करते. एखाद्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहचवत असले तर पोलीस अशा व्यक्तींना, आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतात. ताब्यात घेतल्याने पोलिसांना अमर्यादित अधिकार मिळतात असे नाही.
पोलीस व्यक्तीला केव्हा अटक करते ?
अटक ही एक औपचारिक कायदेशीर कारवाई आहे. एखाद्या व्यक्तीला कायदेशीर नियंत्रणाखाली आणण्यासाठी ही कारवाई करण्यात येते. न्यायालयीन वॉरंटद्वारे अटकेचा अधिकार मिळतो. पण प्रत्येक प्रकरणात वॉरंटची गरज नसते. भारतीय नागरी सुरक्षा संहितातंर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस विना वॉरंट सुद्धा अटक करू शकते.
केवळ आरोप केला म्हणून लागलीच अटक केली जात नाही. गुन्ह्याचे स्वरुप आणि परिस्थितीही पोलिसांना लक्षात घ्यावी लागते. कायदेशीर त्रुटी ठेवता येत नाही. पुढील गुन्हे रोखणे. तपासासाठी, पुराव्यांशी छेडछाड टाळण्यासाठी आणि न्यायालयात आरोपी हजर राहावा यासाठी अटकेची प्रक्रिया करण्यात येते.
आज पुन्हा धडकणार सीजेपी
दरम्यान काल पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली. तरीही तरुण मोठ्या संख्येने जमा झालेले दिसले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन न थांबवण्याचा ठाम निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे. पुन्हा जंतरमंतरची हाक दिली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांना आजही कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सु्द्धा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. हे आंदोलन आता व्यापक स्वरुपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.