AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makkhi Janta Party: माशी मारण्यासाठी हातोडा कशाला? सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर ‘मख्खी जनता पार्टी’ची स्थापना, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Makkhi Janta Party-CJI Surya Kant: सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एका नवीन पार्टीची स्थापना झाली आहे. यापूर्वी मे महिन्यात सरन्यायाधीशांनी काही बेरोजगार तरूण म्हणजे झुरळं असा उल्लेख केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी अस्तित्वात आली होती.

Makkhi Janta Party: माशी मारण्यासाठी हातोडा कशाला? सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर 'मख्खी जनता पार्टी'ची स्थापना, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
मख्खी जनता पार्टी मैदानात,
| Updated on: Oct 10, 2026 | 12:06 PM
Share

Makkhi Janta Party-CJI Surya Kant: दिल्लीत CJP नेत्यांची धरपकड सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके, आशुतोष रांका यांच्यासह युट्यूबर ध्रुव राठी आणि इतर 1000 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या आंदोलकांची धरपकड सुरू आहे. तरीही अनेक ठिकाणाहून जंतरमंतरकडे जाण्यासाठी आंदोलक प्रयत्न करत आहेत. चौका चौकातील पोलिसांची, ड्रोनची त्यांच्यावर करडी नजर आहे. दरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका कथित टिप्पणीनंतर अजून एका नवीन पार्टी अस्तित्वात आली आहे.

माशी मारण्यासाठी हातोडा कशाला?

सीजेपी आंदोलनामुळे मेट्रो स्टेशन बंद करण्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी माशी मारण्यासाठी हातोड्याचा उपयोग का करताय? असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे. सरन्यायाधीशांच्या या कथित टिप्पणीनंतर लागलीच नवीन पक्षाची स्थापना झाली आहे. मख्खी जनता पार्टी नावाने नवीन पक्ष समोर आला आहे. या पक्षाचं सोशल मीडिया अकाऊंटही समोर आले आहे. त्यावर फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. दरम्यान त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे.

दरम्यान 15 मे 2026 रोजी सुनावणीदरम्यान कथित टिप्पणी करण्यात आली होती. काही बेरोजगार तरुण म्हणजे झुरळं आहेत अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केल्याचा दावा करण्यात येत होता. त्यामुळे तरुणांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. हे विधान सर्वसाधारण बेरोजगार तरुणांविरोधात नव्हते, तर केवळ बनावट आणि खोट्या पदव्यांवर वकिली करणाऱ्यांविरोधात होते असे म्हणत सरन्यायाधीशांनी आरोप फेटाळले होते.

पण त्यातून अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापन केली. त्यानंतर केलेल्या जंतरमंतरवरील आंदोलनाने इतिहास घडवला. मोदी कॅबिनेटमधील तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आज 10 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी मैदानात उतरली आहे. आज सीजेपीच्या अनेक प्रमुख नेत्यांची धरपकड झाली आहे. त्याचवेळी नवीन पक्षाचा जन्म झाला आहे.  या डिजिटल पक्षांच्या माध्यमातून तरूणाई त्यांचा आवाज बुलंद करत आहे. विशेष म्हणजे या नवीन पक्षाच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्सचा तुफान पाऊस पडला आहे. तरुणाई त्यावर व्यक्त होत आहे.

Follow Us
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...