आंदोलनापूर्वीच मोठा धक्का, सीजेपीच्या 10 हजार कार्यकर्त्यांची धरपकड; उद्या दिल्लीत काय घडणार?

निवडणूक आयुक्तांच्या कथित घोटाळ्याविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, त्यापूर्वीच देशभरात सीजेपीच्या १० हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि पुणे येथे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली असून, नेत्यांनी 'देशात आणीबाणी' असल्याचा दावा केला आहे.

आंदोलनापूर्वीच मोठा धक्का, सीजेपीच्या 10 हजार कार्यकर्त्यांची धरपकड; उद्या दिल्लीत काय घडणार?
abhijit dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 12:11 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात विरोधी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टीने रान उठवलं आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. कॉकरोच जनता पार्टीने 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, त्यापूर्वीच आंदोलनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली असल्याचा दावा सीजेपीने केला आहे. सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी एक्सवर पोस्ट करून हा दावा केला आहे. राजस्थान पोलिसांनी सीजेपीचे को-इंचार्ज दीपक बालियान यांना ताब्यात घेतलं आहे. त्याच्याशी दुर्व्यवहार करण्यात आला आहे. आमच्या कमीत कमी 10 हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे, असं रांका यांनी म्हटलं आहे. तर देशात आणीबाणी लागू झाल्याचा दावा सौरव दास यांनी केला आहे.

सीजेपीने काल बंगळुरूमध्ये आंदोलन केलं होतं. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी संध्याकाळी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याचा दावा केला आहे. मध्य प्रदेशात इटारसी जंक्शनवर डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची पहिली बातमी आली. हे विद्यार्थी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी दिल्लीला जात होते. त्याशिवाय भोपाळ स्टेशनमध्येही तेलंगनातून येत असलेल्या काही सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. अभिजीत दीपके यांनी या सर्व घटनाक्रमाला आणीबाणी म्हटलं आहे.

Loading...

दीपक बालियानला ताब्यात घेतलं

राजस्थानचे सीजेपीचे को- इंचार्ज दीपक बालियान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं आहे. भाजप एक डॉन पार्टी असल्यासारखी काम करत आहे. पण आम्हाला रोखू शकणार नाहीत, असं सौरव दास यांनी म्हटलं आहे. तर, दीपक बालियान यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या भावालाही मारहाण करण्यात आली, असं रांका यांनी म्हटलं आहे. राकां यांनी सर्व कार्यकर्त्यांना तातडीने अलवरला येण्याचं आवाहन केलं आहे.

 

पुण्यात धरपकड

अभिजीत दीपके यांनीही मोठा दावा केला आहे. पुण्यातून विद्यार्थ्यांचा एक ग्रुप 10 ऑक्टोबरच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रस्त्यातच त्यांना अडवून ताब्यात घेतलं आहे, असा दावा करतानाच देशात आणीबाणी लागल्याची घोषणा का करत नाही? असा सवालच दीपके यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us