AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : नितीन गडकरींचा ताफा पुढे सरकताच मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी-एसपी यांच्यात झटापट, नेमकं काय घडलं?

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान एक विचित्र घटना घडली (Clash Between SP and CM Jairam Thakur security incharge during Minister Nitin Gadkari Himachal Pradesh tour).

VIDEO : नितीन गडकरींचा ताफा पुढे सरकताच मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी-एसपी यांच्यात झटापट, नेमकं काय घडलं?
नितीन गडकरींचा ताफा पुढे सरकताच मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी-एसपी यांच्यात झटापट
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 23, 2021 | 9:19 PM
Share

शिमला : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आज हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर कुल्लू विमानतळावर दाखल झाले. कुल्लू विमानतळावरुन नितीन गडकरी यांचा ताफा पुढे निघाला तेव्हा एक विचित्र घटना बघायला मिळाली. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी यांच्यात जोरदार झडप झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याने कुल्लूच्या एसपींना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Clash Between SP and CM Jairam Thakur security incharge during Minister Nitin Gadkari Himachal Pradesh tour).

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी आणि कुल्लूचे एसपी यांच्यात हाणामारी होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी एसपींना लाथा-बुक्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी पोलीस आणि इतर अधिकारी मारहाण रोखण्याचा प्रयत्न करतात. संबंधित प्रकार घडत असताना काही नागरिक तिथे हा सर्व प्रकार बघत असतात. यावेळी काही नागरिक एसपी साहेबांना मारहाण का करत आहात? असा सवाल करत जोरजोराने ओरडायला लागतात. त्यानंतर एक पांढऱ्या रंगाची कार पुढे जाते. या कारच्या चारही बाजूने पोलिसांची सुरक्षा असते. हा संबंध प्रकार अनेकजण मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करतात.

नेमकं काय घडलं?

नितीन गडकरी कुल्लू विमानतळावर दुपारी दाखल झाले. यावेळी विमानतळाबाहेर फोरलेन प्रकल्पाने बाधित असलेले काही शेतकरी तिथे दाखल झाले होते. त्यांचे विमानतळाबाहेर निदर्शने सुरु होती. यावरुन मुख्यमंत्र्याचे सेक्युरिटी इंचार्ज अॅडिशनल एसपी बृजेश सूद यांना राग आला. याच मुद्द्यावरुन त्यांनी कुल्लूचे एसपी गौरव सिंह यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत बघायला मिळालं (Clash Between SP and CM Jairam Thakur security incharge during Minister Nitin Gadkari Himachal Pradesh tour).

मुख्यमंत्र्यांसमोर सर्व प्रकार

विशेष म्हणजे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर संबंधित प्रकार घडला. एसपी गौरव सिंह यांनी एएसपी बृजेश सूद यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सूद यांनी सिंह यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला.

चौकशीचे आदेश जारी

केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये अशाप्रकारे झडप होणे, निंदणीय असल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून दिली जात आहे. या प्रकरणाचे आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक शिमला येथून कुल्लूच्या दिशेला रवाना झाले.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : ‘टाटा’ भारताची शान ! जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती, बिल गेट्स, वॉरेन बफे यांनाही मागे टाकले

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ