‘टाटा’ भारताची शान ! जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती, बिल गेट्स, वॉरेन बफे यांनाही मागे टाकले

टाटा उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा 'जगात भारी' परोपकारी ठरले आहेत.

'टाटा' भारताची शान ! जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती, बिल गेट्स, वॉरेन बफे यांनाही मागे टाकले

मुंबई : टाटा उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या 100 वर्षांत सर्वाधिक दान करून जमशेदजी टाटा ‘जगात भारी’ परोपकारी ठरले आहेत. हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव फाउंडेशनच्या वतीने दान करणाऱ्या ट़ॉप 50 लोकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षांत तब्बल 102 बिलियन डॉलर्सचं दान दिलं आहे. (Jamshedji Tata became first greatest philanthropist of earlier 100 years)

बिल गेट्स, वॉरेन बफे यांनादेखील मागे टाकले

गेल्या 100 वर्षांच्या दानशूर लोकांच्या यादीत टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) हे प्रथम स्थानी आहेत. टाटा यांनी प्रामुख्याने आरोग्य आणि शिक्षणासाठी मोठे दान दिले आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1892 पासून दिलेल्या मोठ्या देणग्यांचा या हुरुन रिपोर्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. दानशूर लोकांच्या यादीमध्ये टाटा यांनी बिल गेट्स, वॉरेन बफे यांनादेखील मागे टाकले आहे. भारतातील मोठ्या दानशूर व्यक्तींमध्ये विप्रोचे अजीम प्रेमजी यांचाही समावेश आहे.

कोरोना महामारीत मोठे योगदान

दरम्यान, देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. या संकटात टाटा समूह देशाच्या मदतीसाठी धावून आला आहे. टाटा समूहाच्या कंपन्या काही रक्कम गोळा करत आहेत. ज्यातून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण यासाठी या कंपन्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

इतर बातम्या :

‘गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक वरचढ ठरल्याने चीनला उपरती; आपले सैनिक पुरेसे प्रशिक्षित नसल्याची जाणीव’

आरंभ झालाय, अजून लोक जोडले जातील, तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं विधान

काँग्रेसला बाजूला ठेऊन तिसरा फ्रंट काढणार का? बैठकीवर राष्ट्रमंचकडून स्पष्टीकरण जारी

(Jamshedji Tata became first greatest philanthropist of earlier 100 years)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI