काँग्रेसला बाजूला ठेऊन तिसरा फ्रंट काढणार का? बैठकीवर राष्ट्रमंचकडून स्पष्टीकरण जारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी महत्त्वाची राजकीय बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसला बाजूला ठेऊन तिसरा फ्रंट काढणार का? बैठकीवर राष्ट्रमंचकडून स्पष्टीकरण जारी
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:20 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी महत्त्वाची राजकीय बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेस, आपसह एकूण 8 पक्षांचे नेते या बैठकीला हजर होते. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. यात काँग्रेस सोडून इतर बहुतांश भाजपविरोधी पक्ष सहभागी असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अखेर राष्ट्रमंचच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचची या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं (Know all about meeting of Rashtra Manch with opposition parties in Sharad Pawar house).

काँग्रेसला बाजूला ठेऊन तिसरा फ्रंट काढणार का?

माजीद मेमन म्हणाले, “राष्ट्रमंचाची बैठक भाजपविरोधात शरद पवार यांनी बोलावल्याची माहिती चुकीची आहे. ही बैठक राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी पवारांच्या निवासस्थानी बोलावली होती. शरद पवारांकडून मोठी राजकीय घडामोड घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि त्यातून काँग्रेसला बाहेर ठेवल्याचा आरोप चुकीचा आहे. काँग्रेस नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, पण त्यांना कारणाने येता आले नाही. काँग्रेसला वगळून काही सुरु आहे, हे चुकीचं आहे.”

“देशात अलटर्नेट व्हिजन तयार करणं गरजेचं. या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. यशवंत सिन्हा याबाबत एक टीम तयार करतील. ही टीम देशाला एक व्हिजन देत राहील. यात देशातील सर्व स्तरातील लोकांचा समावेश असेल. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकरी, इंधन, केंद्र-राज्य संबंधं अशा अनेक मुद्द्यांवर ही टीम कार्य करणार आहे,” अशी माहिती घनश्याम तिवारी यांनी दिली.

दिल्लीत शरद पवारांच्या घरी खलबतं, तृणमूल, आपसह 8 पक्षांचे कोणते नेते हजर?

तृणमूल काँग्रेस, आपसह एकूण 8 पक्षांचे नेते या बैठकीला हजर होते. यात नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे सुशिल गुप्ता, आरएलडीचे जयंत चौधरी, सपाकडून घनश्याम तिवारी, जावेद अख्तर, पवन वर्मा, के. सी. सिंग, माजीद मेमन, वंदना चव्हाण, जस्टीस ए. पी. शाह यांचा समावेश आहे.

दरम्यान सोमवारीच (21 जून) यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचच्या बैठकीची माहिती देणारं ट्विट केलं होतं. यात त्यांनी शरद पवार ही बैठक आपल्या घरी घेण्यास तयार झाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

संबंधित बातम्या :

पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!

‘राष्ट्रमंच’ची बैठक शरद पवारांच्या घरी, मात्र त्यांनी ती बोलावलीच नव्हती : राष्ट्रवादी काँग्रेस

तिसऱ्या आघाडीसाठी बैठक नव्हती, आम्ही देशाला ‘व्हिजन’ देऊ; राष्ट्रमंचच्या नेत्यांचा दावा

Know all about meeting of Rashtra Manch with opposition parties in Sharad Pawar house

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.