AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदेभारतमध्ये सफाईची पद्धत बदलली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटरवर पोस्ट केला व्हीडीओ

वंदेभारत एक्सप्रेसमध्ये कचऱ्याचा कसा ढीग पसरला आहे असा फोटो आयएएस अवनीश शरण यांनी ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवा व्हीडीओ शेअर करीत सफाईची पद्धत आता बदलली आहे, सहकार्य करा असे आवाहन केले आहे,

वंदेभारतमध्ये सफाईची पद्धत बदलली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीटरवर पोस्ट केला व्हीडीओ
vandebharat (3)Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 30, 2023 | 3:19 PM
Share

दिल्ली : वंदेभारत एक्सप्रेसमध्ये  ( vandebharat ) प्रवासी कचरा करीत असल्याचा फोटो एका आयएएस ( ias ) ऑफीसरने समाजमाध्यमावर व्हायरल केला होता. या फोटोत वंदेभारतचा सफाई कर्मचारी झाडू मारताना दिसत असून कोचमध्ये रिकाम्या बाटल्या, अन्नाची पाकीटे आणि अन्य कचरा पसरलेला दिसत होता. यासंदर्भात भारतीयांच्या कचरा करण्याच्या प्रवृतीवर या आयएएस अधिकाऱ्यांनी मिश्कील टीप्पणी केली होती. त्यावर समाजमाध्यमावर उलट सुलट प्रतिक्रीयाही आल्या होत्या. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल वंदेभारतमध्ये सफाई कर्मचारी प्रवासी कसे शिस्तबद्ध पद्धतीने कचरा गोळा करत आहे, असा व्हीडीओ पोस्ट केला असून सफाईची पद्धत आता बदलली आहे असे म्हटले आहे.

भारतीय प्रवाशांना कचरा करण्याची इतकी सवय झाली आहे, की आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवासी आपला कचरा टाकण्याचा उपक्रम कायम ठेवत असल्याचे आयएएस ( IAS ) अधिकारी अवनीश शरण यांनी समाजमाध्यमावर फोटोसह पोस्ट केले होते. भारतीयांच्या या प्रवृत्तीवर त्यांनी सडकून टीका केली होती. या पोस्टवर समाजमाध्यमावर अनेक उलट सुलट प्रतिक्रीया देखील आल्या होत्या.

भारतीय रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला एकीकडे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे काही अपवादात्मक घटना घडत आहेत. वंदेभारत एक्सप्रेसच्या एका कोचमध्ये कचऱ्याचा कसा ढीग पसरला आहे असा फोटो आयएएस अवनीश शरण यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरवर पोस्ट केल्याने चर्चेला पेव फुटले. या पोस्टमध्ये वंदेभारत एक्सप्रेसचा कर्मचारी झाडू मारताना दिसत आहे. या ट्रेनची सफाई करताना प्रवाशांनी टाकलेल्या कचऱ्याचा अक्षरश: ढीग दिसत आहे. ज्यात उरलेले अन्नाचे बॉक्स, मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्या यांचा खच पडलेला दिसत होता. हा फोटो ट्वीट करताना या आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शन देताना, ‘आम्ही भारताचे लोक’, असे भारतीय घटनेचे पहिले वाक्य लिहीले होते, या फोटोवर इंटरनेट युजरच्या अनेक मजेशीर प्रतिक्रीया आल्या होत्या. या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव वंदेभारतच्या सफाईचा व्हीडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. त्यात Cleaning system changed for #VandeBharat trains. आपले सहकार्य अपेक्षित आहे अशी कॅप्शन दिली आहे. या व्हीडीओ सफाई कर्मचारी दोन आसनांमधून जात आहे. त्याच्या हातात असलेल्या मोठ्या प्लॅस्टीकच्या पिशवीत प्रवाशांकडील कचरा तो गोळा करताना दिसत आहे,

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत