Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटीत ढगफुटी, कॅम्पिंग साइट गेल्या वाहून, 3 जण ठार!

ढगफुटीची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. एसपी गुरदेव शर्मा यांनी सांगितले की, ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली असून आता पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पावसाळा लक्षात घेऊन लोकांनी नदी-नाल्यांच्या काठावर जाऊ नये.

Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटीत ढगफुटी, कॅम्पिंग साइट गेल्या वाहून, 3 जण ठार!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 3:59 PM

हिमाचल प्रदेशामधील (Himachal Pradesh) मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतकेच नाही तर कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण घाटीत ढगफुटी झाली. त्यामुळे पूर येत चोज गावातील काही घरे आणि कॅम्पिंग साईट वाहून गेल्या असून यामध्ये तब्बल 3 जणांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळते आहे. कुल्लूच्या मणिकर्ण घाटीतील चोज गावात ढगफुटी (Cloudburst) झाली असून या पुरातमध्ये चार लोक वाहून गेले आहेत. त्याचबरोबर काही घरेही पाण्याखाली आली असून, गावाकडे जाणाऱ्या पुल देखील वाहून गेला आहे.

प्रशासनाचे पथक मणिकर्ण घाटीत दाखल

ढगफुटीची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. एसपी गुरदेव शर्मा यांनी सांगितले की, ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली असून आता पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पावसाळा लक्षात घेऊन लोकांनी नदी-नाल्यांच्या काठावर जाऊ नये.

शिमल्यात भूस्खलनात एका महिलेचा मृत्यू

रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे शिमल्याच्या ढाली बोगद्याजवळ भूस्खलनाची घटनाही घडली आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहेत, त्यांना आयजीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूस्खलनामध्ये दोन वाहने देखील गेली आहेत.

हवामान खात्याने जारी केला यलो अलर्ट

हवामान खात्याने गुरुवारपासून तीन दिवस यलो अलर्ट जारी केले आहे. यलो अलर्टमध्ये शक्यतो नागरिकांनी घराच्या बाहेर जाणे टाळावे असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच पावसाळ्याच्या हंगामात शक्यतो नदींपासून दूरच राहा असे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आल्याचे कळते आहे.