AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: दादा मंत्री झाले नसते तर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला.

Ajit Pawar: दादा मंत्री झाले नसते तर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगूनच टाकलं
Devendra fadnavisImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 1:46 PM
Share

आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी अजित दादा हे मंत्री नसते तर काय बनले असते याविषयी देखील सांगितले आहे.

“दादांचे बालपण मामाकडे गेले”

शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दादांचे मामा हे कदम कुटुंब. ते संघाचं कुटुंब होतं. त्यांचे मामा संघाचे पदाधिकारी होते. त्यांचं बालपण मामाच्या घराकडे गेलं. त्यामुळे त्यांना कार्याची जाणीव होती. दादा मात्र पवार साहेबांच्या नेतृत्वातून पुढे आले. अजितदादांनी शिक्षण घेतल्यावर टोमॅटो लागवड आणि कुकुटपालन सुरू केलं. जमिनीतून उठून मोठं होण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच सामान्य माणसांच्या अडीअडचणी त्यांना माहिती होत्या. सहकार आणि शेती क्षेत्रात काम करून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते पाहिलं तर त्यांचा भर राजकोषीय स्थैर्यावर असायचा. खर्च कमी आणि महसूल वाढी करायचे. विकासावर त्यांचं प्राधान्य असायचं. खर्चावर नियंत्रण ठेवायचं काम ते करायचे.”

मंत्री झाले नसते तर…

पुढे ते म्हणाले की, “मंत्री झाले नसते तर काय झाले असते, तर शिस्त त्यांच्या पोलिसांची आहे. ते पोलीस झाले असते. किंवा शेतकरी झाले असते. नंतर माझ्या डोक्यात आले की अजितदादा बांधकाम क्षेत्रात इंजिनियर झाले असते. उत्तमातील उत्तम काम ते करायचे. बांधकामांवर त्यांचं बारीक लक्षण असायचे. त्यावर ते लक्ष द्यायचे. प्रत्येक मालाची किंमत विचारायचे. सरकारी कामाचा एक ढाचा असतो. पण अजितदादांच्या देखरेखीत झालेली कामे अत्यंत चांगली होती. अजितदादांनी ज्या मेडिकल कॉलेजची वीट रचली त्याच मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांचा मृतदेह ठेवावा लागला. या सारखं दुर्देव नाही.”

कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा. राज्याच्या तिजोरीचा वारसा दाखवेल, पण विकास कामे थांबवणार नाही असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...