AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲापरेशन टायगरचे जुने फोटो समोर, महाराष्ट्रातील मंत्र्याने गेम फिरवला, पडद्यामागचा दुसरा चेहरा कोण? अखेर सीक्रेट…

जून महिन्यात ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात सामील झाले. 'ऑपरेशन टायगर'ने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली. आता या ऑपरेशनचे जुने फोटो समोर आले असून, श्रीकांत शिंदे हेच याचे पडद्यामागील मुख्य सूत्रधार होते हे स्पष्ट झाले आहे. ओम बिर्ला यांच्यासोबतचे फोटो या दाव्याला दुजोरा देतात.

ॲापरेशन टायगरचे जुने फोटो समोर, महाराष्ट्रातील मंत्र्याने गेम फिरवला, पडद्यामागचा दुसरा चेहरा कोण? अखेर सीक्रेट…
ऑपरेशन टायगरचे फोटो आले समोर
| Edited By: | Updated on: Jul 11, 2026 | 8:45 AM
Share

जून महिन्यात ठाकरे गटाला मोठा हादरा बसला होता. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात एंट्री केली. या ‘ऑपरेशन टायगर’मुळे फक्त मबाराष्ट्रातच नव्हे देशाच्या राजकारणातही मोठी खळबळ नमाजील. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता, तर 6 खासदार पक्षात आल्याने शिंदे गटाची ताकद वाढली. याच ऑपरेशन टायगर संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेन केलेल्या या ‘ऑपरेशन टायगर’चे काही फोटो समोर आले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे फुटीर खासदारांचे फोटो आता समोर आले आहेत.  विशेष म्हणजे यामध्ये श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हेही दिसत असून या ऑपरेशनच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदे हेच होते, अशीही महत्वाची माहिती समोर आली आहे.

श्रीकांत शिंदे व प्रताप सरनाईक, हेच पाच खासदारांना ओम बिर्ला यांच्याकडे घेऊन गेले होते. त्यानंतर श्रीकांत शिंदे हे चार्टर्ड फ्लाईटनेआष्ट ओमराजे निंबाळकर यांनाही घेऊन आले , अशी माहिती आता उघड झाली आहे. ओम बिर्ला यांच्यासोबत फुटीर खासदारांचा फोटो आता समोर आला असून पडद्यामागचा चेहरा कोण, हेही आता समोर आलं आहे.

लीड रोलमध्ये होते श्रीकात शिंदे

18 जून रोजीचा हा फोटो असल्याचं बोललं जात आहे. ऑपरेशन टायगर अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आलं होतं. या ऑपरेशनच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदे हेच होते, असंही आता समोर आलं असून पडद्यामागचा चेहरा त्यांचाच असल्याचंही या फोटोच्या माध्यमातून उघड झालं आहे. ठाकरे गटातील 5 फुटीर खासदारांना श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक, हे दोघे ओम बिर्ला यांच्याकडे घेऊन गेले होते, हेही या फोटोतून स्पष्ट होतंय. त्यानंतर श्रीकांत शिंदेनी चार्टर्ड फ्लाईटने ओमराजे निंबाळकर यांनाही आणलं, अशीसुद्धा माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

फुटीर खासदारांचा फोटो समोर

संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, हे  पाचही फुटीर खासदार जे ठाकरेंच्या पक्षात होते, ते सर्व या फोटोत दिसत आहेत. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, हे मात्र तेव्हा नव्हते. त्यासाठी श्रीकांत शिंदे हे चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीहून नांदेडला गेले आणि  तिथून ते ओमराजे निंबाळकर यांना घेऊन पुन्हा दिल्लीला परतले. त्यानंतर 6 जणांचा कोरम पूर्ण झाला. मग त्यांनी  ओम बिर्ला यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र त्या भेटीचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु