AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे लक्ष औद्योगिकरणावर, बेंगळूर- मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन

औद्योगिकरणाच्या अनुशंगाने झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही दुजोरा दिला. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी ग्वाही सितारामन यांनी दिली.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे लक्ष औद्योगिकरणावर, बेंगळूर- मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
| Updated on: Jul 07, 2022 | 4:00 PM
Share

मुंबई : (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अॅक्शनमोडमध्ये असेलले एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक निर्णय घेण्याचा धडाका कायम ठेवला आहे. आता त्यांनी (Industrialization) ओद्योगिकरणाकडे लक्ष केंद्रित केले असून बेंगळूरू – मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. योग्य जागा न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरु झालेले नाही. यावर पर्याय काढू लागलीच हे काम सुरु केले जाणार आहे तर दिघी पार्टचेही काम जलदगतीने होणार असल्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक (Corridor project) कॉरिडॉर प्रकल्पाच्या ॲपेक्स ॲथॉरिटी अधिकाऱ्यांची घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. त्याचप्रमाणे बल्क ड्रग पार्कची सुरूवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही घेतली दखल

औद्योगिकरणाच्या अनुशंगाने झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही दुजोरा दिला. पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी ग्वाही सितारामन यांनी दिली. तर भारतास खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनविणाऱ्या या अत्यंत महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी तर मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये 5 हजार 542 कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकीन येथील ऑरिक सिटीला उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी 5 हजार 542 कोटींची गुंतवणूक आली असून 375 एकर भूखंड उद्योगांना देण्यात आले आहेत. याठिकाणी 3 लाख लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. पंतप्रधानांनी देखील या प्रकल्पाचे कौतुक केले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

वाराणसी – मुंबई कॉरिडॉरचे महत्व काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर 4 राज्यातील मुख्यमंत्री हे बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वाराणसी – मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम होण्याबाबत या बैठकीत सूचना केली. हा प्रकल्प राज्याला हितकारी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. वाराणसी – मुंबई कॉरिडॉर झाल्यास आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे जागेअभावी रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.