अभिजीत दिपके याचे होणार लग्न, आईचा मोठा खुलासा, दोन वर्षांपासून..

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला मोठे यश आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. आता त्यामध्येच अभिजीत दिपके याच्या आईने मोठे भाष्य केले.

अभिजीत दिपके याचे होणार लग्न, आईचा मोठा खुलासा, दोन वर्षांपासून..
Abhijeet Dipke and mom
| Updated on: Jul 30, 2026 | 9:46 AM

कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन जंतर मंतरवर झाले. या आंदोलनाला मोठे यश मिळाले. शेवटपर्यंत कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्यावर ठाम राहिली. अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आता त्याच्या घरी पोहोचला. यावेळी त्याचे छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. आता अभिजीत दिपके याच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अभिजीत दिपके याच्या आईने नुकताच त्याच्या लग्नाबद्दल मोठे विधान केले. अभिजीत दिपके याच्या कुटुंबियांनी त्याच्या लग्नाबद्दल बोलताना म्हटले की, अभिजीत याच्यासाठी लग्नाचे स्थळ खूप जास्त येत आहेत.

पण त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत तो पूर्णपणे आर्थिक सक्षम होणार नाही, तोपर्यंत तो लग्न करणार नाही. अभिजीतच्या आईने म्हटले की, मागील दोन वर्षांपासून त्याला लग्नासाठी स्थळे येत आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून अधिक स्थळ येत आहेत. लग्नासाठी चांगले स्थळ येत आहेत. त्यावेळी त्याने म्हटले की, माझे शिक्षण पूर्ण होऊ द्या आणि मला चांगल्याप्रकारे आर्थिक सक्षम होऊ द्या, त्यानंतर मी लग्न करेल.

मी त्याला कायमच सांगितले की, आपल्याकडे व्यवस्थित पैसा पाणी आहे. पण त्याने नेहमीच म्हटले की, मला स्वत: पैसा कमायचा आहे. जून 2026 मध्ये अभिजीत दिपके अमेरिकेच्या बॉस्टन येथून दिल्ली येथे पोहोचला. नीट परीक्षेच्या विरोधात त्याने मोर्चा उघडला होता. त्यानंतर तो जंतर मंतरवर आंदोलनाला बसला. मात्र, त्याला पहिल्या वेळी अजिबात यश मिळाले नाही.

मात्र, त्यानंतर या आंदोलनाने धमाका केला. देशभरातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढली. सरकारला अखेर या आंदोलकांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. मात्र, विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेतल्या जात नसल्याने अभिजीत दिपके याने सरकारला मोठा इशारा दिला. पुन्हा एकदा आंदोलनाला बसण्याची थेट धमकी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us