
उत्तर प्रदेशातील ललिलपुर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजात गेल्या तीन वर्षांपासून काम करत असलेल्या तोतया डॉक्टरची पोल खुलली आहे. आरोपी डॉक्टर आईच्या मृत्यूचा बहाणा बनून फरार झाला आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. भावा आणि बहिणीच्या भांडणात या बोगस डॉक्टरचे पितळ अखेर उघड झाले आहे.
या बोगस डॉक्टरचे नाव अभिनव सिंह असून तो ललीतपूर मेडिकल कॉलेजात त्याच्या मेहुण्याच्या नावाची एमबीबीएसची बोगस डिग्री लावून नोकरी करत होता. अभिनव आणि त्याची बहिण डॉ. सोनाली सिंह यांच्यात सुरु असलेल्या संपत्तीच्या वादानंतर त्याचे पितळ उघड झाले. बहिणीने मेडिकल कॉलेज ललितपूरच्या प्रधानाचार्य यांनी पत्र लिहून या संदर्भात माहिती दिली.
बहिणीने तिच्या पत्रात लिहिले की ललितपुरच्या तालाबपुरा येथे राहणारा आपला भाऊ अभिनव सिंह याने पती राजीव गुप्ता नावाने फर्जी डिग्री लावून हृदयरोग तज्ज्ञाची नोकरी करत आहे. याचा खुलासा होताच या बोगस डॉक्टरने दोन ओळीचे पत्र लिहून राजीनामा दिला आणि तो फरार झाला. राजीनाम्यानंतर अभिनव यांना राजीनाम्याचे कारण देताना त्याच्या आईचा मृ्त्यू झाल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.मयंक शुक्ला यांनी सांगितले की साल २०१३ मध्ये अभिनव सिंह याने आधारकार्डला स्वत:चा फोटो लावून घोटाळा केला.
अभिनव सिंह आयआयटी रुडकीतून बीटेक केल्यानंतर आयआरएससाठी सिलेक्ट झाला होतो. परंतू काही कारणांनी तो पळून ललितपूरला आला होता. शुक्ला यांनी सांगितले की बोगस डॉक्टरच्या विरोधात एफआयआर दाखल होणार आहे. तसेच त्याच्याकडून सर्व पगार वसुल केला जाणार आहे. याची माहिती जिल्हा प्रशासन आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. बुधवारी बोगस डॉक्टरविषयी तक्रार मिळाल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी इम्तियाज अहमद यांनी सांगितले.
हे प्रकरण खोटे ओळखपत्र बनवून नोकरी मिळवण्याचा आहे. भावाच्या विरोधात त्याच्या बहिणी पत्र लिहून तक्रार केली होती. त्यात तिने आपल्या पतीच्या नावाची डिग्रीवापरुन तिचा भाऊ डॉक्टरची नोकरी करत होता असे सांगितले. या भावा बहिणीत मध्य प्रदेशातील खुरई आणि सागर येथील संपत्तीवरुन वाद झाल्यानंतर बहिणी भावाची डिग्री बोगस असल्याची तक्रार केली.