AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Keralam CM: अखेर सस्पेन्स संपला…कोण आहे केरळम राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, काँग्रेसने तो डाव टाकला

Keralam Congress CM: पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. चारही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. पण काँग्रेसचे केरळमधील घोडे मुख्यमंत्री पदावरून अडले होते. पण आता सस्पेन्स दूर झाला आहे. काँग्रेसने गुरुवारी व्ही. डी. सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली.

Keralam CM: अखेर सस्पेन्स संपला...कोण आहे केरळम राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, काँग्रेसने तो डाव टाकला
मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन, राहुल गांधीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 14, 2026 | 1:04 PM
Share

Karalam CM V D Satheesan: केरळम राज्यातील मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अखेर संपला. काँग्रेसने गुरुवारी व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. व्ही. डी. सतीशन हे केरळम राज्यातील पुरावूर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, केरळम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील निवडणुका झाल्या. चार राज्यातील मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. पण केरळम राज्यात मुख्यमंत्री पदासाठी मुहूर्त लागत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी चर्चेची गुऱ्हाळं सुरू होती. या स्पर्धेत के सी वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन हे होते. अखेर सतीशन यांचे नाव समोर आले. काँग्रेसचे महासचिव दीपा दासमुंशी यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. आता केरळम राज्यात काँग्रेस पर्व सुरू झाले आहे. डावे पक्षाची सत्ता या निवडणुकीत संपुष्टात आली आहे. तर तामिळनाडूमधील सत्तेत काँग्रेस की पोस्टवर आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल या 4 मे रोजी जाहीर झाले होते. केरळमध्ये काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली. LDF च्या 10 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेसला केरममध्ये 63 जागा मिळाल्या. याशिवाय CPI(M) पक्षाला 26, IUML पक्षाला 22, सीपीआय पक्षाला 8, KEC पक्षाला 7, RSP पक्षाला 3 जागा मिळाल्या. तर इतर खात्यात 11 जागा मिळाल्या. यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला. केरळम काँग्रेसने युडीएफसह आघाडी केलेली आहे. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून सस्पेन्स काही संपला नाही. मुख्यमंत्री पदाचे गुळपीठ सुरूच होते. जवळपास 10 दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सतीशन यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

परावूर मतदारसंघातून 6 वेळा आमदार

व्ही डी सतीशन केरळम राज्यातील परावूर या मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांनी राज्यात काँग्रेसला बुस्टर डोस दिल्याचे मानले जाते. मरणासन्न काँग्रेसमध्ये जिवन फुंकण्यात त्यांचा मोलाचा हात असल्याचे मानले जाते. 1990 च्या दशकात विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. केरळच्या विद्यार्थी यूनियन आणि युथ काँग्रेसमध्ये त्यांनी मोठी भूमिका निभावली. सतीशन यांची संघटनेवर मजबूत पकड असल्याचे मानले जाते. ते एक आक्रमक नेते आहेत. त्यांच्या भाषणाची केरळममध्ये तरुणाईला भुरळ पडलेली आहे. आक्रमक संवाद फेक हे त्यांचे वैशिष्ट्ये मानले जाते. 2021-2026 या कालावधीत ते केरळम विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी केलेल्या सडेतोड भाषणामुळे अनेकदा पिनाराई विजयन यांच्या सरकारला त्यांनी पळो की सळो करून सोडले होते.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं