CWC Meeting : ‘देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू’, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली आहे. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पाच राज्यातील पराभवावर चिंतन करण्यात आलं. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते.

CWC Meeting : 'देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू', काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?
काँग्रेस कार्यकारिणी बैठक
Image Credit source: ANI
सागर जोशी

|

Mar 13, 2022 | 7:21 PM

नवी दिल्ली :पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (Congress Working Committee) संपली आहे. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पाच राज्यातील पराभवावर चिंतन करण्यात आलं. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला आलेलं अपयश आणि पंजाबमधील गमवावी लागलेली सत्ता, या पार्श्वभूमीवर या बैठकीत मोठा खल झाला. तसंच ‘देशाच्या जनतेसोबत मिळून जे स्वातंत्र्य मिळवलं होतं, ते स्वातंत्र्य जनतेसोबत मिळूनच वाचवू’, असाही एक मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला.

नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे तीन मोठे नेते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा मुलगा अनिल के. अँटोनी यांनी ट्विटरद्वारे तशी माहिती दिलीय.

काँग्रेस हाच सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष – शशि थरुर

आज देशात काँग्रेस हाच सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवसंजिवनी निर्माण करणं गरजेचं असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर रविवारी म्हणाले. याबाबत थरुर यांनी एक ट्वीट करत आकड्यांचं गणितही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. थरुर यांनी केलेल्या ट्वीटनुसार देशभरात काँग्रेसचे 753 आमदार आहेत. तर भाजपचे आमदार काँग्रेसपेक्षा दुप्पट असून त्यांची संख्या 1 हजार 443 इतकी आहे. त्या पाठोपात तिसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावर आम आदमी पक्ष आहे. 

इतर बातम्या :

‘मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!’ अशोक गेहलोत म्हणतात, ‘राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं’

‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें