Priyanka Gandhi : संसदेच्या दारातच भावाबद्दल ‘शर्म करो’असे शब्द ऐकल्यानंतर प्रियंका गांधी तडक त्या भाजप खासदाराकडे गेल्या अन्..VIDEO
Priyanka Gandhi : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचे आता काही शेवटचे दिवस उरले आहेत. आज संसदेच्या आवारात एक प्रसंग घडला. त्यावर प्रियंका गांधी लगेच React झाल्या.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात सरकार आणि विरोधी पक्षामध्ये मतभेद कायम आहेत. मंगळवारी संसद भवन परिसरात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांमध्ये वाद झाला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि भाजप खासदार मुकेश दलाल आमने-सामने आल्यानंतर हा वाद झाला. प्रियंका गांधी संसदेच्या दिशेने जात होत्या, तेव्हा भाजपं खासदार मुकेश गांधी यांनी ‘राहुल गांधी शर्म करो, शर्म करो’ अशी घोषणाबाजी केली. ‘झारखंडमध्ये विद्यार्थ्यांसोबत जी निर्दयता दाखवली त्यावर राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर द्यावं’ असे पोस्टर त्यांच्या हातात होते. प्रियंका गांधी मुकेश दलाल यांना बोलल्या की, ‘राहुल गांधी झारखंडच्या विद्यार्थ्यांना भेटले’ सवयीप्रमाणे हसून त्या पुढे निघून गेल्या.
त्यावर भाजपं खासदार मुकेश दलाल म्हणाले की, “राहुल गांधी यांनी झारखंडचा दौरा कधी केला?. राहुल गांधी आणि केजरीवला झारखंडला जाण्याची हिम्मत का दाखवत नाहीत?. प्रियंका गांधी यांनी मला सांगितलं की, राहुल गांधी यावर काम करतायत. म्हणून मी त्यांना विचारलं की, राहुल गांधी अजून झारखंडला का गेले नाहीत”
त्यानंतरही मतभेद संपले नाहीत
दिल्लीत Gen Z च्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि राम मंदिर दान चोरी प्रकरणात विरोधी पक्ष अमित शाह यांच्याकडे उत्तर मागतोय. सभागृहात गदरोळ सुरु असल्याने सभागृहाच कामकाज होत नाहीय. अमित शाह सभागृहात उत्तर द्यायला तयार आहेत, असं सरकारकडून सोमवारी सांगण्यात आलं. विरोधी पक्षाला चर्चेला उपस्थित राहून उत्तर ऐकावं लागेल. त्यानंतर मतभेद संपले नाहीत.
#WATCH | Delhi: Congress MP Priyanka Gandhi Vadra arrives at the Parliament amid NDA MPs’ protest against the Opposition, alleging them of running away from discussion in Parliament.
Priyanka Gandhi Vadra says, “Rahul Gandhi has met the students from Jharkhand.” pic.twitter.com/CwcSA96x4P
— ANI (@ANI) August 11, 2026
विरोधी पक्ष यावर गप्प का?
भाजप आता झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्ज वरुन विरोधी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्ष यावर गप्प का? असा भाजप नेत्यांचा सवाल आहे. एनडीए खासदारांनी आज या मुद्यावरुन संसद परिसरात मार्च काढला होता. मी पहिल्यांदा सरकारच्या खासदारांना प्रदर्शन करताना पाहतेय असं प्रियंका गांधी म्हणाल्या. आम्ही यांना मजबूर केलय. आता यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावं असं प्रियंका म्हणाल्या.