AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला मोठा हादरा बसणार; दिग्गज नेता साथ सोडण्याच्या तयारीत

congress party : काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पंजाब निवडणुकीआधी पक्षाचा बडा नेता नाराज झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसला मोठा हादरा बसणार; दिग्गज नेता साथ सोडण्याच्या तयारीत
| Updated on: Jul 02, 2026 | 1:42 PM
Share

पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु पक्षाने बुधवारी संघटनेत कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे लोकसभा खासदार, वरिष्ठ नेते मनीष तिवारी हे नाराज झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मनीष तिवारी पक्षाची साथ सोडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस हायकमांडच्या निर्णयानंतर खासदार मनिष तिवारी यांनी केलेली सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे मनिष तिवारी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. तिवारी यांनी उपहासाने लिहिलंय की, ‘ज्या व्यक्तीकडे कौशल्य असतं, त्याच्यात कोणताही मोठा दोष नसतो.  माझ्याकडे लोक आणि असुरक्षिततेवर खात्रीशीर उपाय असता तर बरं झालं असतं’. मला काँग्रेसकडून 45 वर्षांत खूप काही मिळालं आहे. मी संपूर्ण आयुष्य पक्षाच्या सेवेसाठी समर्पित केलंय, असे त्यांनी पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर शेवटच्या ओळीत इंग्रजीत म्हटलं की, ‘जे व्हायचं आहे, ते होईलच’.

काँग्रेसने काय निर्णय घेतला?

काँग्रेसने 1 जुलै रोजी स्पष्ट केले की, अमरिंदर राजा वडिंग पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहतील. तर प्रताप सिंह बाजवा हे विधानसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत राहतील. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभा खासदार सुखजिंदर सिंग रंधावा यांची कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर विजय इंदर सिंगला यांची निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आणि खासदार अमर सिंग यांची जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तिघांची निवडणूक प्रचार समितीत नियुक्ती

सुखविंदर सिंग डॅनी, राजकुमार वेरका, संगत सिंग गिलजियान यांची पंजाब काँग्रेसच्या (Punjab Congress) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सुखपाल सिंग खैरा, राणा गुरजीत सिंग, धर्मवीर गांधी यांची निवडणूक प्रचार समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे