AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी मुख्यमंत्र्यांसहित 2 दिग्गज नेते पक्ष सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

congress political news : काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिग्गज नेते नाराज झाल्याची चर्चा आहे.

काँग्रेसला मोठा धक्का बसणार, माजी मुख्यमंत्र्यांसहित 2 दिग्गज नेते पक्ष सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
| Updated on: Jul 04, 2026 | 7:47 AM
Share

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या 1 वर्षाआधीच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसने निवडणुकीसाठी संपूर्ण टीमची घोषणा केली होती. यात अमरिंदर सिंह यांना निवडणुकीसाठी प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती. तर माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची निवडणूक प्रचार समितीचं प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर दिग्गज नेत्यांनाही टीममध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पंजाब काँग्रेसने निवडणुकीसाठी टीमची घोषणा केल्यानंतर दोन दिग्गज नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी हे नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर सुखजिंदर सिंह रंधावा आहेत. त्यांची कोर कमिटी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरंतर दोन्ही नेते अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांना त्यांच्या पदावरून हटवलं नाही, त्यामुळे दोन्ही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे.

या दोघांव्यतिरिक्त मनीष तिवारी देखील नाराज असल्याची चर्चा आहे. यंदा त्यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नाराजी व्यक्त केली होती. नाराज नेत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा ही माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची होत आहे. काँग्रेसने पंजाबच्या टीमची घोषणा केल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी हे मौन बाळगून आहेत. त्यांनी शुक्रवारी त्यांच्या समर्थकांची एक बैठक बोलावली होती. चन्नी यांनी या बैठकीसाठी 3 खासदार, 12 आमदार आणि 40 माजी आमदारांना बोलावलं होतं.

चरणजीत सिंह चन्नी यांनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार आणि 25 माजी आमदारांनी बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीला पक्षात काम करणारे काही महत्त्वाचे नेते देखील सहभागी झाले होते. चन्नी यांच्या घरी बैठकीला जाणाऱ्या नेत्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी, माजी कॅबिनेट मंत्री भारत भूषण आशू, गुरकीरत कोटली,माजी आमदार गुरप्रीत कांगड यांच्या नावाचा समावेश आहे. चन्नी यांच्या घरी झालेल्या बैठकीत अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चन्नी यांना द्यायला हवी होती, अशी मागणी समर्थकांनी बैठकीत केली. चन्नी यांना महत्त्वाचं पद नाकारल्याने काँग्रेस हायकमांडने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात आलाय. तर दुसरीकडे इतर दिग्गज नेतेही काँग्रेस हायकमांडवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या दिवसांत नाराज नेते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे