AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोध करताना पोलिसांवरच काँग्रेसची महिला कार्यकर्ता थुंकली; भाजपने म्हटलं लज्जास्पद आणि घृणास्पद

तर यानंतर नेट्टा डिसूझा यांचा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लिहिले की, लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. काय सोनिया, प्रियांका आणि राहुल यांच्यावर कारवाई करणार का?

विरोध करताना पोलिसांवरच काँग्रेसची महिला कार्यकर्ता थुंकली; भाजपने म्हटलं लज्जास्पद आणि घृणास्पद
काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याImage Credit source: tv9
| Updated on: Jun 21, 2022 | 9:47 PM
Share

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. त्याविरोधात काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्तेही नाराज झाले आहेत आणि ईडीच्या चौकशी विरोधात आंदोलने करत आहेत. अशा प्रकारची आंदोलने गेली चार दिवस देशाच्या विविध भागात करण्यात येत आहेत. असेच एक आंदोलन आज मंगळवारी दिल्लीतही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले. तसेच यावेळी निदर्शने केली. मात्र यावेळी एका काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनीही (Congress women activists) पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. ज्यात ती महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर थुंकताना दिसत आहे. या नेत्या काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा नेट्टा डिसोझा आहेत. व्हिडिओमध्ये त्या पोलिसांच्या गाडीतून काही सुरक्षा कर्मचाऱ्यांवर थुंकताना (spit) स्पष्ट दिसत आहेत. त्यांचे हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजधानी दिल्लीतील नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. राहुल गांधींच्या चौकशीच्या विरोधात मंगळवारी दिल्लीतही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. व्हिडिओमध्ये एक महिला कर्मचारी पोलिस कर्मचाऱ्यांवर थुंकताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून नेट्टा डिसोझा यांनी खुलासा केला. त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, त्यावेळी त्यांच्या तोंडात धूळ गेली होती, जी ती थुंकत होती. तसेच डिसोझा यांनी ट्विटरवर लिहिले की, मीडियामध्ये माझ्याविरोधात अपप्रचार सुरू आहे. त्या वेळी माझ्या तोंडात धूळ गेली जी मी तोंडातून बाहेर काढली. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. सत्यमेव जयते!

तर यानंतर नेट्टा डिसूझा यांचा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लिहिले की, लज्जास्पद आणि घृणास्पद. आसाममध्ये पोलिसांना मारहाण केल्यानंतर, हैदराबादवर तिची कॉलर धरून, आता महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा पोलीस आणि महिला सुरक्षा कर्मचार्‍यांवर थुंकतात कारण राहुलची भ्रष्टाचाराबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे. काय सोनिया, प्रियांका आणि राहुल यांच्यावर कारवाई करणार का?

दुसरीकडे महिला काँग्रेसने नेट्टा डिसोझा यांच्यावर बळजबरी करण्यासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. काँग्रेसने पोलिसांना भाजपची कठपुतलीही म्हटले आहे. ऑल इंडिया महिला काँग्रेसने व्हिडिओ ट्विट करून लिहिले, सत्याग्रह कधीही हार मानत नाही, सत्य कधीही झुकत नाही! मोदीजींच्या कठपुतळी पोलिसांनी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेट्टा डिसोझा यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले!

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.