मुली रात्रभर बीचवर फिरतात, त्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही : गोवा मुख्यमंत्री

| Updated on: Jul 30, 2021 | 4:06 AM

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नुकत्याच दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय.

मुली रात्रभर बीचवर फिरतात, त्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही : गोवा मुख्यमंत्री
Follow us on

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नुकत्याच दोन अल्पवयीन मुलांवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुली रात्रभर बीचवर फिरतात. त्याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही. त्यांनी आत्मपरिक्षण करावं, असं मत प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय. विरोधकांनी सरकार जबाबदारी झटकू शकत नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

“पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चांगलेच धारेवर धरलेय. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले. अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना अटक केली आहे. मात्र पालकांचीही जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलांना रात्रभर बाहेर सोडता तेव्हा मुलांच्या सुरक्षेचीही जबाबदारी घ्या. मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही, असं प्रमोद सावंत म्हणाले.

“निरर्थक सल्ले देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावे”

सावंत यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. विरोधकांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीमान्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, “असे निरर्थक सल्ले देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी बसावे.” गोव्यातील काँग्रेस नेते अल्टोनीओ डी कोस्टा यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा दर्जा खालावला आहे, अशी टीका केली. नागरिकांनी रात्री फिरताना का घाबरायचे? गुन्हेगारांची जागा ही तुरुंगात आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही’, मिरजेत भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

आधी म्हणाले अॅलोपॅथीने लाखो लोकांचा जीव घेतला, देशभरातून टीकेनंतर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे

‘मग काय फासावर लटकू का?’ कोरोना लसीच्या तुटवड्यावर सदानंद गौडा यांचं वक्तव्य

व्हिडीओ पाहा :

Controversial statement of Goa CM BJP leader Pramod Sawant on physical abuse victim