‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही’, मिरजेत भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

"आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले, तर वाद विकोपाला जाईल आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही," असं भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

'प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही', मिरजेत भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 11:16 PM

सांगली : भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी कोरोना निर्बंधांवरुन दंगलीचा अप्रत्यक्ष इशारा देत वादग्रस्त वक्तव्य केलंय. “आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले, तर वाद विकोपाला जाईल आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही,” असं भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कडक निर्बंधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यानी हे वक्तव्य केले आहे. कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन निष्कामी झाले. शुक्रवारी दुकाने उघडणार असा इशारा दिला आहे. सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली, तेव्हा ते बोलत होते.

मिरजेत गेले कित्येक दिवस व्यापारी दुकाने उघण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. पण लॉकडाऊन कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. दोन वेळा निर्बध डावलून दुकाने उघण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला, पण पोलीस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली.

आता आज (21 जुलै) आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. जिल्हा प्रशासन राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिराजेसाठी दंगल नवीन नाही पुन्हा दंगल घडेल असे संकेत त्यांनी दिले आहे.

हेही वाचा :

मिरजच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये गुन्ह्यांची मालिका, रेमडेसिव्हीरचा काळा बाजार, एकाला अटक

80 रुग्णांच्या मृत्यूला डॉ. महेश दुधनकर जबाबदार, सांगलीत आणखी एका डॉक्टरवर आरोप, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

मिरजेच्या रुग्णालयात 87 रुग्णांचा मृत्यू, तिघा अॅम्ब्युलन्स चालकांना अटक, आरोपींचा आकडा 13 वर

व्हिडीओ पाहा :

Controversial statement of BJP MLA Suresh Khade in Miraj about restriction and riots amid Corona

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.