पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळीच कानपूरमध्ये हिंसाचार, मोहम्मद पैंगबर यांच्याविषयीच्या टिप्पणीवरुन वादंग, पोलीसांचा लाठीमार

पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. संशयाच्या आधारे काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे 12 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळीच कानपूरमध्ये हिंसाचार, मोहम्मद पैंगबर यांच्याविषयीच्या टिप्पणीवरुन वादंग, पोलीसांचा लाठीमार
हिंसाचारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 5:04 PM

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या कानपूर दौऱ्यावेळीच, कानपुरात हिंसाचाराची घटना घडली आहे. एका भाजपा नेत्याने मोह्हमद पैंगबर (Mohammad Paigambar) यांच्याविषयी केलेल्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी मुस्लीम बहुसंख्य असलेल्या भागात बंद पुकारण्यात आला होता. पोलिसांच्या सुरक्षेतच जुम्म्याची नमाज (Prayers) अदा करण्यात आली. त्यानंतर सद्भावना चौकीजवळ दोन्ही पक्ष आमनेसामने आले. गर्दीला अटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या कानपुरात तणाववूर्ण शांतता आहे. ही घटना कानपूरच्या बेकगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर घडली.

कानपूर बंदचे केले होते आवाहन

जौहर फॅन्स असोसिएशन आणि अन्य मुस्लीम संघटनांनी शुक्रवारी मुस्लीम समुदायाला बंदचे आवाहन केले होते. या बंदला मोठा पाठिंबा पाहावयास मिळाला. कानपूर परिसरात असलेले चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हीरामन पुरावा, दलेल पुरावा, मेस्टन रोड, बाबू पुरवा, रावतपुरा या सर्व भागात काही अंशी तर काही ठिकाणी पूर्ण बंद पाळण्यात आला.

पैगंबराबाबतचे वादग्रस्त विधान

जुम्म्याच्या नमाजावेळी मशिदींमध्ये झालेल्या संभाषणात मोहम्मद पैगंबराबाबतचे वादग्रस्त वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला. पोलिसांनी शहरातील कुठल्याही भागात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती. नमाजानंतर अनेक ठिकाणी, चौकांमध्ये गर्दी एकवटली होती. पोलिसांनी या गरदीला समजावून ती पांगवण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

भाजपा प्रवक्त्याविरोधात गुन्हा दाखल

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी ज्ञानवापी मुद्द्यावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान मोहम्मद पैंगबराबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी देवीच्या मंदिराला भेट

दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद दुसर्‍यांदा त्यांच्या वडिलोपार्जित गाव पारौंख येथे पोहोचले होते. तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंदही उपस्थित होत्या. राष्ट्रपतींनंतर काही वेळातच पंतप्रधान मोदीही लखनौहून थेट पारौंखला पोहोचले. तर यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी पाथरी देवीच्या मंदिराला भेट देत पुजा केली. यानंतर ते आंबेडकर भवनाचे उद्घाटन करणार आहेत. तर रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा पारौंख गावात येत आहेत. यापूर्वी तो गतवर्षी 27 जून रोजी आपल्या गावी आले होते.

12 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा

दरम्यान कानपूरच्या बेकगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ उडाला. ज्यात बाजार बंद करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. गदारोळ आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही लोकांनी दगडफेक झाली. सध्या येथे वातावरण तणावपूर्ण बनले होते. तर लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. लाठीचार्ज केला. लोक रस्त्यावर उतरवले आहेत. तर लोक अधूनमधून दगडफेक करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. संशयाच्या आधारे काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. कानपूरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे 12 पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.