AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवतांच्या अमेरिकेतील कार्यक्रमावरून वाद, 61 संघटनांचा विरोध, नेमकं कारण काय?

Mohan Bhagwat US Oppose: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावरून अमेरिकेत वादाची ठिणगी पडली आहे. जवळपास 61 संघटना त्यांच्या कार्यक्रमाविरोधात एकवटल्या आहेत. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्यासह इतर नेत्यांनी विरोधाचा सूर आळवला आहे. कारण तरी काय आहे?

मोहन भागवतांच्या अमेरिकेतील कार्यक्रमावरून वाद, 61 संघटनांचा विरोध, नेमकं कारण काय?
मोहन भागवत, आरएसएसImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 26, 2026 | 4:23 PM
Share

अमेरिकेत मोहन भागवतांच्या कार्यक्रमावरुन वाद पेटला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त भारतात कार्यक्रम झाली आहे. जगातही अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या मैडिसन स्केयरवर कार्यक्रम होणार आहे. त्याला कडाडून विरोध होत आहे. 61 संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे. द्वेष पसरवणाऱ्यांचे या ठिकाणी काही काम नाही असा सूर स्थानिक नेत्यांनी आळवला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

मुस्लिम काऊन्सिलचाही विरोध

अमेरिकेतील न्युयॉर्क शहरात या कार्यक्रमाला विरोध होत आहे. काल 25 ऑगस्ट रोजी सिटी हॉलमध्ये इंडियन-अमेरिकेन मुस्लिम काऊन्सिलशी (IAMC) संबंधित धार्मिक संघटनांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली आणि सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला विरोध केला. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अमेरिकेन काँग्रेसची निवडणूक लढवणारे नेते ब्रँड लँडर यांचाही समावेश आहे. आमच्या शहरात भागवत, आरएसएस आणि त्यांच्या द्वेषाला कोणतेही स्थान नसल्याचा विरोधकांचा दावा आहे.

ममदानी यांचा विरोध

न्यूयॉर्क शहरातील भारतीय वंशाचे महापौर जोहरान ममदानी यांनी मोहन भागवत यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते या कार्यक्रमाला समर्थन देऊ शकत नाही. शहर प्रशासनाकडे एखादा खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार आहे की नाही हे आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.

1. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा 29 ऑगस्टला न्यूयॉर्कच्या मैडिसन स्केयरवर कार्यक्रम होणार आहे

2. या कार्यक्रमात 5000 अमेरिकन भारतीय सहभागी होणार आहेत

3. भागवत यासाठी अमेरिकेत पोहोचले, तिथं त्यांचं स्वागतही झालं. पण रस्त्यावर उतरुन काही संघटना त्यांचा विरोधही करत आहेत

4. जवळपास 61 संघटनांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे

5. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही

6. पण कोणता खासगी कार्यक्रम रद्द करण्याचे अधिकार आपल्याला आहेत की नाहीत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय

7. भागवतांचा हा कार्यक्रम RSSच्या शताब्दी वर्षाचा एक भाग आहे

8. या कार्यक्रमाचं आयोजन AHEAD फोरमनं केलंय

9. रक्षाबंधनाच्या दिवशी या कार्यक्रमातून ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश दिला जाईल

Follow Us
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय