Corona Update : केंद्र सरकार अलर्ट, पंतप्रधान मोदींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकार अलर्ट झालं आहे, भारतातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज बैठक घेतली.

Corona Update : केंद्र सरकार अलर्ट, पंतप्रधान मोदींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 10:21 PM

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा धोका वाढत असताना भारत देखील सतर्क झाला आहे. चीन, जपान, ब्राझील आणि अमेरिकेत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. भारतात देखील काही रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. जवळपास २ तास चाललेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री मनसुख मांडविय उपस्थित होते. ( PM Narendra Modi High Level Meeting on Corona )

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव देखील उपस्थित होते.

कोरोना संकट पुन्हा एकदा जगावर घोंगावत आहे. अनेकांमध्ये याबाबत भीती आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री देखील अलर्ट झाले असून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी दक्षता घेतली जात आहे.

अनेक गर्दीच्या ठिकाणी आता मास्क घालण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सरकारने देखील बुस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी बुस्टर डोसची उपलब्धता वाढवण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत. भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीची टेस्ट केली जात आहे.

चीनमध्ये सध्या परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. कोरोनाचे निर्बंध असताना लोकं रस्त्यावर उतरली. आंदोलने झाली त्यानंतर सरकारला माघार घ्यावी लागली. कोरोनाचे निर्बंध हटवल्याने आता देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. लाखो लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आता स्थलांतर सुरु झालं आहे. पण सरकारकडून हे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकं जीव वाचवण्यासाठी सुरक्षितस्थळ शोधत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत. मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

चीनमधील ही परिस्थिती आपल्या देशात येऊ नये म्हणून अनेक देश अलर्ट झाले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट झपाट्याने पसरत असल्याने त्याला रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.