ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार, कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह अन्य कोणत्या लस मिळणार?

| Updated on: May 13, 2021 | 8:50 PM

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काहिसा दिलासा देणारी माहिती दिलीय. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात विविध कंपन्यांच्या कोरोना लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार, कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह अन्य कोणत्या लस मिळणार?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना कोरोना लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय. काही राज्यांना तर लसीकरण मोहीम स्थगित करावी लागली आहे. अशावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काहिसा दिलासा देणारी माहिती दिलीय. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात विविध कंपन्यांच्या कोरोना लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. इतकंच नाही तर कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनसह अन्य सहा कंपन्यांच्या कोरोना लस भारतात उपलब्ध होणार असल्याचंही जावडेकरांनी सांगितलंय. (216 crore doses of corona vaccine will be available in India between August and December)

“भारतात भारतीयांसाठी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 216 कोटी पेक्षा जास्त डोसची निर्मिती केली जाईल. कोणतीही लस जी WHO आणि FDA ने मंजूर केली असेल ती भारतात येऊ शकते. त्यासाठी आयात परवाना 1 ते 2 दिवसांत दिला जाईल. कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही”, असं ट्वीट जावडेकर यांनी केलंय.

लसीकरणात भारत तिसऱ्या क्रमांकावर

निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी बुधवारी सांगितलं की, भारतात कोरोना लसीचे जवळपास 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेतील ही संख्या 26 कोटी आहे. त्यामुळे भारत यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकने पुढील 4 महिन्यांसाठी आपली उत्पादन योजना केंद्राला सोपवली आहे. कंपन्यांनी सांगितलं की, ऑगस्टपर्यंत ते अनुक्रमे 10 कोटी आणि 7.8 कोटी डोसचं उत्पादन वाढवतील.

कोणत्या लसीचे किती डोस मिळणार?

ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भारतात कोरोना लसीचे किती डोस उपलब्ध असतील अशी विचारणा केल्यानंतर डॉ. व्ही. के. पॉल यांनी त्याबाबत माहिती दिली. त्यात कोविशील्डचे 75 कोटी, कोव्हॅक्सीनचे 55 कोटी, बायो व्हॅक्सिनचे 21 कोटी, झायडस कॅडिलाचे 5 कोटी, नोव्हाव्हॅक्सचे 20 कोटी, जिनोव्हाचे 6 कोटी आणि स्पुटनिकचे 15 कोटी डोसचा समावेश असेल. यानुसार ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान एकूण 8 कंपन्यांचे मिळून 216 कोटी डोस उपलब्ध असणार आहेत.

स्पुटनिक लस पुढील आठवड्यापासून देण्यात येणार

रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा असल्याची  माहिती वी. के. पॉल यांनी दिली आहे. जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

Vaccine Cocktail | दोन वेगवेगळ्या कोरोना लसींचे डोस घेतले तर? संशोधनाचा निष्कर्ष काय सांगतो?

Covaxin | 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी, DCGI कडून भारत बायोटेकला परवानगी

216 crore doses of corona vaccine will be available in India between August and December