सार्वजनिक सुट्ट्या, सरकारी योजनांची माहिती थेट मोबाईलवर, प्रकाश जावडेकरांकडून डिजीटल कॅलेंडर आणि डायरीचे उद्घाटन

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारत सरकारच्या डिजीटल कॅलेंडर आणि डायरीचे उद्घाटन केले. (Prakash Javadekar Digtial Calendar)

सार्वजनिक सुट्ट्या, सरकारी योजनांची माहिती थेट मोबाईलवर, प्रकाश जावडेकरांकडून डिजीटल कॅलेंडर आणि डायरीचे उद्घाटन
प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 6:57 PM

नवी दिल्ली: केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारत सरकारच्या डिजीटल कॅलेंडर आणि डायरीचे उद्घाटन केले. राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात जावेडकर यांनी अँड्राईड आणि आयओएस मोबाईल अ‌ॅप्लिकेशन स्वरुपातील कॅलेंडर आणि डायरीचं लाँचिंग केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अ‌ॅप निर्मिती करण्यात आली आहे. आता सार्वजनिक सुट्ट्या, सरकारी योजनांची माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. (Prakash Javadekar launches digital calendar and diary)

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅलेंडर आणि डायरी असणारे अ‌ॅप मोफत उपलब्ध होणार असल्याचं सांगतिले. हे कॅलेंडर आणि डायरी 11 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्यांसाठी कॅलेंडर आणि डायरी 15 जानेवारीपासून उपलब्धहोणार आहे. यापुढे दरवर्षी कॅलेंडर आणि डायरी अ‌ॅप जारी करण्यात येईल.

डिजीटल इंडियाला प्रोत्साहन

प्रत्येक महिन्यासाठी वेगळी थीम अ‌ॅपमध्ये उपलब्ध असणार आहे. भारतातील लोकप्रिय व्यक्तींची माहिती त्या अ‌ॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल, या अ‌ॅपमध्ये दरवेळी शासकीय योजनांची माहिती कळवली जाणार आहे, असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कॅलेंडर आणि डायरी डिजीटल स्वरुपात लाँच करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजीटल इंडिया’ अभियानाला पोत्साहन देणे हा हेतू असल्याचं सांगण्यात आले.

कॅलेंडर आणि डायरीमध्ये  शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. यामध्ये सरकारी सुट्टया, महत्वाच्या तारखा, महापुरुषांचे प्रेरणादायी विचार या गोष्टींचा समावेश असेल, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली. (Prakash Javadekar launches digital calendar and diary)

दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागातर्फे छापण्यात येणारी डायरी आणि कॅलेंडर ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत पोहोचत होते. नव्या डिजीटल स्वरुपातील कॅलेंडर आणि डायरी देशातील कोणत्याही व्यक्तीला वापरता येणार आहे.

डिजीटल डायरी आणि कॅलेंडरचे उद्घाटन

प्रकाश जावडेकर यांनी भारत हा एकमेव देश आहे जो वातावरणीय बदलांविषयीचे नियम पाळतो, असं म्हटलं आहे. भारत जगाच्या तुलनेत फक्त 6 ते 7 टक्के कार्बनचं उत्सर्जन करतो. वातावरणीय बदलांवरील एका वेबिनारमध्ये प्रकाश जावडेकर बोलत होते. भारत जगातील वातावरणीय बदलांना कारणीभूत नाही, तरी देखील वातावरणीय बदलांबाबतच्या नियमांचं पालन करणारा एकमेव देश आहे, असंही जावडेकर म्हणाले.

संबंधित बातम्या:

Prakash Javadekar | ‘मुळा-मुठा नदी प्रकल्प लवकरच मार्गी लावणार’, प्रकाश जावडेकरांची घोषणा

Delhi | 100 पैकी 10 टक्के शेतकऱ्यांना कृषी कायद्याबद्दल गैरसमज, तो आम्ही दूर करु : प्रकाश जावडेकर

Prakash Javadekar launches digital calendar and diary

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.