Coronavirus: क्वारंटाईनसाठी घरात जागा नव्हती, पठ्ठ्याने 11 दिवस ठोकला झाडावर मुक्काम

भारतात गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. | Boy quarantine on a tree

Coronavirus: क्वारंटाईनसाठी घरात जागा नव्हती, पठ्ठ्याने 11 दिवस ठोकला झाडावर मुक्काम
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 2:27 PM

हैदराबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेल्या भारतात गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने अनेक कोरोना रुग्णांचे (Coronavirus) हाल पाहावेनासे झाले आहेत. या सगळ्यामध्ये आता आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे. (coronavirus positive Boy spent 11 days quarantine period on a tree)

कोरोना झाल्यानंतर रुग्णाला घरातील इतर व्यक्तींपासून तात्काळ वेगळे राहण्याची गरज असते. अन्यथा इतर व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका तरुणालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र, क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच बसून 11 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याची माहिती पुढे आली आहे.

या तरुणाचे नाव शिवा असून तो अवघ्या 18 वर्षांचा आहे. कोठानंदीकोटा गावात राहणाऱ्या शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घरातच क्वारंटाईन व्हायला सांगितले होते. मात्र, घर लहान असल्याने शिवाला तिथे राहणे शक्य नव्हते. अशावेळी गावकऱ्यांनी शिवाला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, कोणीही शिवाच्या मदतीसाठी पुढे आले नाही. तेव्हा शिवाला घराशेजारच्या झाडावरच क्वारंटाईन होण्याची शक्कल सुचली. बांबूच्या साहाय्याने शिवाने झाडावर एक लहानशी मचाण तयार केली आणि त्यावरच बसून 11 दिवस काढले.

कुटुंबीय दोरीला बांधून जेवण द्यायचे

कोठानंदीकोटा गावात 350 कुटुंबे राहतात. प्राथमिक आरोग्य केंद्र पाच किलोमीटर अंतरावर तर नजीकचे रुग्णालय 30 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाला कोरोना झाल्यामुळे आजुबाजूचे लोक घरातून बाहेर पडायला तयार नव्हते. त्यामुळे शिवाने झाडावरच राहण्याचा निर्णय घेतला. एक बादली दोरीला बांधून त्यामधून शिवाला अन्नपदार्थ व इतर गरजेच्या गोष्टी पुरवल्या जात होत्या.

संबंधित बातम्या:

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर

Covid-19: कोरोनाच्या उपचारात गेमचेंजर औषध; दिल्लीच्या ‘एम्स’ला मिळाली पहिली बॅच

(coronavirus positive Boy spent 11 days quarantine period on a tree)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.