भारत-पाकिस्तान फाळणी महात्मा गांधी रोखू शकले असते का? त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं
प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या भेटीत माउंटबॅटन म्हणाले होते की, भारतात आल्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांना जवळ आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जेणेकरून कोणताही संघर्ष निर्माण झाला तर त्यांच्या मदतीने मी गांधींना तटस्थ करू शकेन. पण मला हे फार विचित्र वाटले की एक प्रकारे ते सगळे गांधींच्या विरोधात आणि माझ्यासोबत होते. एक प्रकारे ते मला त्यांच्या वतीने गांधींना सामोरे जाण्यास प्रोत्साहित करत होते.

3 जून 1947 रोजी निर्णायक बैठक झाली होती. पण या बैठकीला महात्मा गांधी गैरहजर राहिले. याच बैठकीत देशाच्या भवितव्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते बैठकीला हा उपस्थित राहिले नाही असं विचारले असता ते म्हणाले होते की, ते काँग्रेसचे सदस्यही नाहीत. माऊंटबॅटनसोबतच्या या भेटीत काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे एक दिवस आधी 2 जून रोजी महात्मा गांधी माउंटबॅटनला भेटले होते. माउंटबॅटनने त्यांना दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत जे निर्णय घ्यायचे होते त्याची माहिती दिली होती. त्या दिवशी महात्मा गांधी काहीच बोलले नाहीत. का? त्या दिवशी त्यांनी मौन धरले होते. 4 जून रोजी महात्मा गांधी पुन्हा एकदा माउंटबॅटन यांना भेटले होते. माऊंटबॅटन यांनी त्यांना सांगितले की सर्व काही तुमच्या सूचनेनुसार होत आहे. तेव्हा गांधींनी विचारले की, मला फाळणी कधी हवी होती? ...
