AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील असे देश ज्यांनी कधीच युद्ध लढलं नाही, आहेत प्रचंड श्रीमंत

जगात असे देखील काही देश आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकदाही कोणतीही लढाई लढलेली नाहीये. हे देश प्रचंड श्रीमंत आहेत. अशाच काही देशांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

जगातील असे देश ज्यांनी कधीच युद्ध लढलं नाही, आहेत प्रचंड श्रीमंत
एकदाही युद्धात सहभागी न झालेले देश Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 10:20 PM
Share

सध्या अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे केवळ या तीन देशांचंचं नुकसान झालं असं नाही, तर या युद्धाचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. जगभरात इंधन टंचाई जाणवत आहे. भारत देखील या समस्येमधून सुटू शकला नाही. युद्ध कोणतंही असो त्या युद्धामध्ये नुकसान हे होतच असतं. जगातील जवळपास सर्वच देशांनी कधी नं कधी युद्धाचा सामना केला आहे. युद्धामुळे होणाऱ्या नुकसानाची झळ सोसली आहे. मात्र या जगामध्ये असेही काही देश आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकदाही कोणासोबत युद्ध केलेलं नाही, हे देश खूप शांत पण तेवढेच श्रीमंत देखील आहेत, अशाच काही देशांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मॅरिनो – मॅरिनो हा जगातील एक छोटा देश आहे. या देशाने आतापर्यंत आपल्या इतिहासामध्ये एक देखील युद्ध लढलेलं नाहीये. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी देखील या देशानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. या देशावर त्यावेळी जर्मनीच्या सैन्यांनी काही काळ ताबा मिळवला होता. मात्र त्यानंतर जर्मनीने या देशाला आपल्या ताब्यातून मुक्त केलं. 1944 मध्ये जर्मनीने या देशावर ताबा मिळवला होता. जर्मनीने या देशाचा उपयोग आपल्या शत्रू राष्ट्रांवर हल्ला करण्यासाठी केला. कारण या देशाची भौगोलिक परिस्थिती युद्धासाठी अनुकूल आहे. या देशाचं क्षेत्रफळ केवळ 61 वर्ग किलोमीटर एवढंच आहे. तर या देशाची लोकसंख्या केवळ 33,000 ते 34,000 एवढीच आहे. मात्र येथील लोक प्रचंड श्रीमंत आहेत. या देशाचा समावेश हा जगातील श्रीमंत देशांच्या यादीमध्ये होतो.

आयसलँड – आयसलँड हा देखील असा देश आहे, ज्याने आतापर्यंत कधीही कोणत्याही युद्धात सहभाग घेतलेला नाहीये. कोणतीही लढाई लढलेली नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला आणि हा देश अचानक चर्चेमध्ये आला. आयसलँडला 1944 साली स्वातंत्र्य मिळालं. हा देखील एक श्रीमंत देश असून, येथील लोकांचं दरडोई उत्पन्न हे जवळपास 88,000 डॉलर इतकं आहे. हा देश प्रचंड शांत आहे. तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो.

लिक्टेनस्टीन – या यादीमध्ये तिसरा देश आहे तो म्हणजे लिक्टेनस्टीन या देशाने देखील आतापर्यंत कोणतंही युद्ध केलेलं नाही, येथील लोक देखील प्रचंड श्रीमंत असून, नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न हे 2 लाख डॉलर एवढं प्रचंड आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?