काँग्रेसचे सरकार असते तर भारताचे पंतप्रधान इथे असते, तो फोटो शेअर करत राहुल गांधी यांची मोदींवर जहरी टीका..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली. यादरम्यान त्यांनी G3 परिषदेमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी सरकारवर टीका केली. भाजपाची अंतर्गत यंत्रणा कमकुवत झाल्याचेही त्यांनी म्हटले.

काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी APEC शिखर परिषदेचा फोटो शेअर करत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला. हेच नाही तर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना थेट करार करणारा पंतप्रधान म्हटले. राहुल गांधी यांनी फोटो शेअर करत म्हटले की, काँग्रेसची सत्ता असती तर भारताचा पंतप्रधान इथे बसला असता. तीन देशांसोबत भारताचाही पंतप्रधान असता. राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिसत आहेत. G3 च्या मंचावर हे तिन्ही नेते बोलताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी टीका करत लिहिले की, जर काँग्रेसची सत्ता असतील तर भारताचे पंतप्रधान या शक्तीशाली व्यासपीठाचा हिस्सा असता.
एक असा पंतप्रधान जो करार करण्यावर भर देतो. बैठकीच्या मंचावर बसत नाही. चीनने आयोजित केलेल्या APEC शिखर परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन एकाच मंचावर आले. या परिषदेत विविध देशांमधील युद्ध, परमाणू विषय यावर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भाषणात त्यांच्या पक्षाने भाजपाची विचारधारा पुढे आणल्याचे म्हटले.
त्याचा परिणाम मागील 8 महिन्यांपासून दिसत आहे. शिकागो विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बोलताना राहुल गांधी यांनी दावा केला की, भाजपाची अंतर्गत रचना विस्कळीत झाली आहे. सरकारचे मंत्री आणि विरोधकांच्या संपर्कात असून आतमधील माहिती देतात. आम्ही भारत सरकारची आणि भाजपाची विचारधारा संपवली आहे. विद्यार्थ्यांनी भाजपाची कमकुवत केले.
त्यांनी पुढे म्हटले होते की, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पुर्ण प्रशासन भाजपाच्या नियंत्रणाखाली आहे. सीबीआय, आयआरएस आणि पूर्ण नोकरदार त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारवर जोरदार टीका करताना राहुल गांधी दिसत आहेत. राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
