AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपूरचे 'दीक्षाभूमी' असे नामांतर करण्याची मागणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून झाल्याने हे नामांतर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंनीही याला पाठिंबा दर्शवला आहे. दादरच्या नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही नवी मागणी करून सरकारला आव्हान दिले आहे.

नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, संजय राऊत यांची सर्वात मोठी मागणी
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 10:43 AM
Share

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा गोंधळ कायम असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नवीन मागणी केली आहे. नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. सरकारने त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी दादरचं चैत्यभूमी करण्याच्या मुद्द्यावर थेट बोलणं राऊत यांनी टाळलं.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाला अभिमान आहे. आत्मीयता आणि श्रद्धा आहे. बाबासाहेबांना सर्वात मोठी श्रद्धांजली कधी ठरेल? दादर छोटं स्टेशन आहे. त्यापेक्षा नागपूरचं नाव बदला. दीक्षाभूमी करा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांती नागपुरातून झाली. हे नामांतर सरकारने केलं, तर आम्ही त्यांच्यासोबत राहू, असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंची सूचना

दादरच्या नामांतरावर सरकारने घुमजाव केलं आहे. ही प्रिटिंग मिस्टेक असल्याचं सरकारने म्हटलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार हीच एक प्रिटिंग मिस्टेक आहे. हे सरकारच मिस्टेकने आलं आहे. कोर्ट आता सांगेलच. संविधानाच्या माध्यमातूनच ही मिस्टेक झाली आहे. पण नागपूरला दीक्षाभूमी हे नाव योग्य आहे. नागपूरचं दीक्षाभूमी करा. उद्धव ठाकरेंनी ही सूचना केली आहे. काल ते माझ्याशी बोलले. नागपूरचं नाव दीक्षाभूमी झालं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्यासाठी मोठं स्मारक कोणतं असेल तर इंदू मिल आणि नागपूरचं दीक्षाभूमी होणं. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी बनवावा. कोणी विरोध करणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करू, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

प्रकल्पाची किंमत का वाढली हे सांगावं

बाबासाहेबांचं इंदू मिलमध्ये स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. भव्य स्मारक व्हावं ही आमची मागणी आहे. पण या स्मारकाच्या प्रकल्पाची किंमत का वाढली हे मी सांगू शकत नाही. टेंडर, धरण, नद्यांच्या टेंडरच्या किंमती वाढतात हे समजतो. पण स्मारकाच्या प्रकल्पाची किंमत वाढत असेल तर त्यावर सरकारने बोलावं, असं ते म्हणाले.

सरकारचं घुमजाव

दरम्यान, राज्य सरकारने दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण चैत्यभूमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आंबडेकरी जनतेत उत्सााहाचे वातावरण होते. राज्यभर जल्लोष करण्यात आला होता. पण दुसऱ्या दिवशी सरकारने घुमजाव केला. आम्ही दादर रेल्वे स्थानकाचं नव्हे तर दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आंबेडकरी जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवर आंबेडकरी कार्यकर्ते सडकून टीका करत आहेत.

Follow Us
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल