Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळाचं संकट वाढतंय, आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीला हाय अ‌लर्ट, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात 'गुलाब' (Cyclone Gulab)चक्रीवादळाचा फटका बसण्याचा इशारा जारी केला आहे.

Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळाचं संकट वाढतंय, आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीला हाय अ‌लर्ट, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Gulab
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 9:17 AM

नवी दिल्ली. भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात ‘गुलाब’ (Cyclone Gulab)चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झालं आहे. आयएमडीच्या वादळ चेतावणी विभागानं चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही याचा पिरणाम जाणवू शकतो.

आयएमडीने म्हटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.

वारे 70-80 किमी प्रतितास वेगाने जातील

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या अंतर्गत आंध्र प्रदेश आणि ओडिशासाठी इशारा जारी करण्यात आला आहे. 26 सप्टेंबरच्या संध्याकाळी गुलाब चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणमजवळ धडकेल असा अंदाज आहे. या दरम्यान, वारे 70-80 किमी प्रति तास वेगाने वाहू शकतात.

ओडिशा सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गजपति, गंजम, रायगडा, कोरापूट, मलकाजगिरी, नबरंगपूर आणि कंधमाल या सात जिल्ह्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार हे वादळ दक्षिण ओडिशा आणि शेजारील आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकू शकते.

महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे.  आज ते ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Weather: नको नको रे पावसा, मराठवाड्यातील जनतेचं वरुणदेवतेला साकडं… आणखी पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

WEATHER ALERT | सावधान…! बंगालच्या उपसागरावर घोंघावतेय चक्रीवादळ; महाराष्ट्रालाही अलर्ट

Cyclone Gulab to hit Odisha Andhra Pradesh coast today landslide and heavy rain alert also to Maharashtra

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.