AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather: नको नको रे पावसा, मराठवाड्यातील जनतेचं वरुणदेवतेला साकडं… आणखी पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

Weather: नको नको रे पावसा, मराठवाड्यातील जनतेचं वरुणदेवतेला साकडं... आणखी पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
27 सप्टेंबर रोजी औरंगाबादसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 8:21 PM
Share

औरंगाबाद: सप्टेंबर महिन्यात औरंगाबादसह मराठवाड्याला पावसानं चांगलंच (Heavy Rain in Marathwada) झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे (Thunderstorm in Many Districts ) शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिकं वाया गेली. मेहनतीनं उभं राहिलेले पिक डोळ्यादेखत वाहून गेल्यानं गावोगावचे शेतकरी हताश झालेत. मराठवाड्यात कधी नव्हे तो एवढा पाऊस होतोय. आता धरणं भरली, विहिरी भरल्या, नद्या नाले वाहू लागलेत. त्यामुळे आता तुझी वृष्टी थांबव, सूर्यदेवतेचं दर्शन होऊ देत, अशी प्रार्थना मराठवाड्यातील जनता करत आहे.

औरंगाबाद शहरातलं हवामान कसं?

शहरात आज (25 सप्टेंबर) सकाळपासून सूर्याचं दर्शन झालं नाही. सकाळपासून वातावरण ढगाळ असून थंड वाराही सुटला आहे. शहरात आज मुसळधार पाऊस झाला नाही, मात्र दिवस भर थोड्या थोड्या वेळाने पावसाची रिपरिप सुरुच होती. शहरातलं किमान तापमान 23 तर कमाल तापमान 28 अंश सेल्सियस दरम्यान नोंदलं गेलं. ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला.

मराठवाड्यात पुढचे तीन दिवस कसे?

26 सप्टेंबर – रविवारी जालना, बीड, उस्मनाबाद आणि लातूसह औरंगाबाद जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 27 सप्टेंबर- औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर लातूर,नांदेड, उस्मानाबाद, परभणी,हिंगोली व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. 28 सप्टेंबर – औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिली.

राज्यात कशी असेल स्थिती?

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. उद्या संध्याकाळी 26 तारखेला ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये 26, 27, 28 सप्टेंबरला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्यावतीने वर्तवण्यात आला आहे. (Heavy rain forecast in next 3 days in Aurangabad, Marathwada, Maharashtra)

इतर बातम्या-

नाशिकः रिमझिम धून, आभाळ भरून, हरवले मन…पुन्हा पाऊस पाऊस!

Maharashtra Rain Live Updates | पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलं

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.