Maharashtra Rain Live Updates | पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलं

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात तीव्र (depression) होण्याची आणि पश्चिम-वायव्य दिशेने येत्या 2 ते 3 दिवसात सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी राज्यात येत्या 4, 5 दिवसांत मुंबई-ठाणेसहीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain Live Updates | पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलं
प्रातिनिधिक फोटो

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात तीव्र (depression) होण्याची आणि पश्चिम-वायव्य दिशेने येत्या 2 ते 3 दिवसात सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परिणामी राज्यात येत्या 4, 5 दिवसांत मुंबई-ठाणेसहीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील 3-4 तासांत रायगड, पुणे, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर येत्या 3-4 तासात मुंबई, ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने त्याविषयीची माहिती दिलीये.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 12 Sep 2021 20:42 PM (IST)

  पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलं

  पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलं असून धरण परिसरात पावसाचा जोर ही कायम आहे एक हजार 350 क्यूसेक ने वीज निर्मिती संचाद्वारे पाण्याच्या विसर्ग करण्यात येणार आहे. तर रात्री आठ वाजता सांडव्या द्वारे दोन हजार शंभर क्युसेक असा एकुण तीन हजार 450 क्युसेक विसर्ग साेडण्यात येणार आहे.तरी पवना नदी काठच्या तीरावरील नागरिकानी सर्तक राहावे.

 • 12 Sep 2021 19:22 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 6 नवे कोरोनाबाधित, 6 जणांची कोरोनावर मात

  नागपूर :

  नागपुरात आज 6 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  शून्य मृत्यू ,तर 6 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्ण संख्या – 493120

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 482938

  एकूण मृत्यू संख्या – 10119

 • 12 Sep 2021 18:30 PM (IST)

  कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  कराड :

  कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला

  सही वक्री दरवाजे अडीच फुटांवर उचलले

  एकूण 23380 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू

  धरणात 23780 क्युसेक पाण्याचं आवक सुरु

  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 • 12 Sep 2021 16:41 PM (IST)

  पुण्याचे खडकवासला धरण 97 टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

  पुणे –

  – खडकवासला धरण ९७ टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला,

  – सकाळी १० वाजता ८५६क्यूसेक, १२ वाजता १७१२ क्यूसेक, तर दुपारी तीन वाजता ३४२४ क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला,

  – पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो,

  – नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून आवाहन.

 • 12 Sep 2021 15:37 PM (IST)

  मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा, वृद्ध महिला डॉक्टरला लुटणाऱ्या पाच जणांना अटक

  सांगली :

  मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा.

  वृद्ध महिला डॉक्टरला लुटणाऱ्या पाच जणांना अटक

  तर एका महिलेचा सहभाग

  विश्रामबाग पोलीस सहाय्यक निरीक्षक अमित पाटील यांची कारवाई

 • 12 Sep 2021 15:35 PM (IST)

  राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, हवामान विभागाचा इशारा

  हवामान विभागाचा महत्त्वपूर्ण इशारा :

  पश्चिम किनारी पुढील तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील
  राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल
  मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हयांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा
  घाट भागातदेखील जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
  १३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  १४ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  १५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  १६ सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा जोर किंचित कमी होईल.

 • 12 Sep 2021 14:05 PM (IST)

  हिंगोलीत दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाला सुरुवात

  हिंगोलीत दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाला सुरुवात

  जिल्ह्याच्या काही ठिकाणी पावसाला सुरुवात

  शेतकरी पुन्हा चिंतेत

 • 12 Sep 2021 12:53 PM (IST)

  अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरले

  भंडारदरा धरण भरले

  अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण

  धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

  प्रवरा नदित पाणी झेपावले

  अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली

  यावर्षी एक महिना उशिराने भरले धरण

  भंडारदरा धरणात झालाय 11 टिएमसी साठा

  पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

  भंडारदरा धरणानंतर आता निळवंडे धरण भरण्याची प्रतीक्षा

  प्रवरा नदित पाणी झेपावले

  अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली

  यावर्षी एक महिना उशिराने भरले धरण

  भंडारदरा धरणात झालाय 11 टिएमसी साठा

  पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

  भंडारदरा धरणानंतर आता निळवंडे धरण भरण्याची प्रतीक्षा

 • 12 Sep 2021 10:28 AM (IST)

  तीन टप्यात एफआरपी देण्याच्या प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज पासून मिस कॉल मोहीम

  कोल्हापूर :

  तीन टप्यात एफआरपी देण्याच्या प्रस्तावा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज पासून मिस कॉल मोहीम

  आज पासून 30 सप्टेंबर पर्यंत राबवली जाणार मोहीम

  मिस कॉल मोहीमेसाठी स्वाभिमानीनं जारी केला नवा नंबर

  8448183751 या नंबर वर मिस कॉल देण्याच स्वाभिमानीच ऊस उत्पादकांना आवाहन

  मोहिमेचा आधार घेत प्रस्तावित निर्णया विरोधात स्वाभिमानी न्यायालयात धाव घेणार

 • 12 Sep 2021 10:24 AM (IST)

  कोयनेचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडणार

  कराड

  कोयनेचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडणार

  दुपारी 2 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू करणेत येणार आहे.

  कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे.

  कोयना धरण पाणीसाठा 103.19 TMC झाला आहे.

  धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होणार असल्याने कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

 • 12 Sep 2021 10:24 AM (IST)

  गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरु

  नाशिक – गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे धरणातून दुपारी 12 वाजता 500 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

 • 12 Sep 2021 07:26 AM (IST)

  व्हायरल इन्फेक्शनमुळे नाशिकमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

  नाशिक –

  – व्हायरल इन्फेक्शनमुळे नाशिकमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

  – दररोज मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात रुग्ण होतायत तपासणीसाठी दाखल

  – वातावरणातील बद्दल ठरतोय व्हायरल इन्फेक्शनला कारण

  – मात्र त्रास झाल्यास हलगर्जीपणा न करता तपासणी करून घ्या, आरोग्य विभागाचं नागरिकांना आवाहन

 • 12 Sep 2021 07:25 AM (IST)

  कोयना धरण पायथा वीजगृहातून पाणी विसर्ग सुरु होणार

  कराड

  कोयना धरण पायथा वीजगृहातून पाणी विसर्ग सुरु होणार

  कोयना धरण पुर्ण भरण्याकडे वाटचाल सुरु

  पावसाची उघडीप मात्र धरणातील पाणीसाठा नियमनासाठी कोयना नदी पात्रात पाणी विसर्ग सुरु केला जाणार

  सकाळी 10 वाजता होणार विर्सग सुरु होणार

  105 tmc पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 102 tmc पाणीसाठा

 • 12 Sep 2021 07:23 AM (IST)

  उजनी धरणाच्या साठ्यात पाच टक्क्यांची वाढ

  सोलापूर – उजनी धरणाच्या साठ्यात पाच टक्क्यांनी झाली वाढ

  पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमध्ये झालेल्या संततधार पावसाने उजनी मध्ये दौंड मधून 5 हजार क्यूसेसने विसर्ग सुरू

  पाच दिवसात पाच टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ

  अद्यापही  उजनी धरण 100 टक्के भरण्यासाठी 35 टक्के पाणी वाढ होणे गरजेचे

 • 12 Sep 2021 07:20 AM (IST)

  नाशिक शहरात काल पासून पावसाच्या हलक्या सरी

  नाशिक शहरात काल पासून पावसाच्या हलक्या सरी

  शहरासह जिल्ह्यात 12.2 मिमी पावसाची नोंद

  जिल्ह्यात मात्र पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमीच

  गेल्या आठवड्यात पश्चिमच्या चक्रीय वाऱ्या मुळे कमी दाबाचा पट्टा झाला होता तयार

  त्यामुळेच राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण झाले तयार

  गेल्या आठवड्या पासून होत असलेला पाऊस मात्र सरासरी पेक्षा 3 टक्क्यांनी जास्त

 • 12 Sep 2021 07:15 AM (IST)

  पुराच्या आधीच नाशिककरांना मिळणार अलर्ट

  नाशिक – पुराच्या आधीच नाशिककरांना मिळणार अलर्ट

  पुराचा धोका टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून फ्लड सेन्सर बसवायला सुरुवात

  फ्लड सेन्सर मुळे प्रशासनाला सर मिनिटाला कळणार पाण्याची पातळी

  जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी फ्लड सेन्सर अत्यंत उपयुक्त

  पाच ठिकाणी फ्लड सेन्सर च काम पूर्ण

 • 12 Sep 2021 07:14 AM (IST)

  गंगापूर धरण 94 टक्के भरलं

  नाशिक – गंगापूर धरण 94 टक्के भरलं

  शहरासह जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

  नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

  धरणातून आज पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता

  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 • 12 Sep 2021 07:04 AM (IST)

  वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्री पासून पावसाची संततधार सुरु

  वसई-विरार

  वसई विरार नालासोपाऱ्यात रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे

  रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे..

  सध्या शहरात कुठेही सकल भागात पाणी साचलेले नाही

  पण आभाळ पूर्णपणे भरलेले असून, जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे

  विरार पूर्व विवा जहांगीड परिसरातील सकाळी 6.35 ची ही दृश्य आहेत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI