AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Alert : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; रविवारी ताशी 75 किमी वेगाने वाहणार वारे, प्रशासन सतर्क

ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये हवेचा वेग वाढणार असून, रविवारी सुमारे 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Cyclone Alert : ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; रविवारी ताशी 75 किमी वेगाने वाहणार वारे, प्रशासन सतर्क
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: twitter
| Updated on: May 06, 2022 | 11:17 AM
Share

देशभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरण शांत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊ लागले आहेत. ओडिशाच्या (Odisha) किनारपट्टीवर पुढील 24 तासांमध्ये चक्रीवादळ (cyclone) धडकण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन सतर्क झाल्याचे पहायला मिळत आहे. खबरदारी म्हणून ज्या भागात हे चक्रीवादळ धडकणार आहे, त्या भागात एनडीआरएफच्या (National Disaster Response Force) 17 तुकड्यासह 212 सरक्षण दलाच्या तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ओडिशाचे विशेष मदत आयुक्त (एसआरसी) प्रदीप कुमार जेना यांनी म्हटले आहे की, पुढील 24 तासांमध्ये ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

पुढे बोलताना प्रदीप कुमार जेना यांनी म्हटले आहे की, ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या या चक्रीवादळाचा प्रभाव हा राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. संबंधित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली असून, त्यांना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या बैठकीत पूर्वतयारीचा देखील आढावा घेण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, एनडीआरएफ दलाला देखील आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 24 तास हे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

यावेळी बोलताना भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे की, सध्या पूर्व भारतात वादळाची स्थिती असून, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाऊस पडू शकतो. रविवारी ताशी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. आम्ही मच्छिमारांना असे आवाहन करतो की, चक्रीवादळाचा धोका पहाता त्यांनी दिनांक पाच मे ते आठ मे पर्यंत समुद्रात मोसेमारी करण्यासाठी जाऊ नये. या चक्रिवादळाचा प्रभाव हा 18 जिल्ह्यांमध्ये जाणवण्याची शक्यात आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.