हिमाचलमध्ये होणाऱ्या 72 तासांच्या एका बैठकीमुळे चीन प्रचंड टेन्शनमध्ये? असं काय कारण आहे?
2019 नंतर पहिल्यांदा इतकी मोठी बैठक धर्मशाळा येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली होती. चीन या बैठकीमुळे प्रचंड टेन्शनमध्ये आहे. या बैठकीमुळे चीनची इतकी अस्वस्थतता का?

नव्या दलाई लामांच्या नियुक्तीसाठी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे हालचाली वाढल्या आहेत. 14 वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो आपल्या जन्मदिवसाच्या आधी धर्मशाळा येथे तीन दिवसांची बैठक करणार आहेत. या बैठकीत जगभरातील 100 बौद्ध धर्मगुरु सहभागी होणार आहेत. दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण? याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. 6 जुलै रोजी तिबेटी धर्मगुरु याची घोषणा करु शकतात. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार 2019 नंतर पहिल्यांदा इतकी मोठी बैठक धर्मशाळा येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली होती.
ब्रिटेनिकानुसार बौद्ध धर्म गुरुंना लामा म्हटलं जायचं. 11व्या शताब्दीमध्ये दलाई लामांच पद बनवण्यात आलं. सुरुवातीला दलाई लामा हे फक्त एक धार्मिक आणि श्रद्धेच पद होतं. वेळेनुसार या पदाची जबाबदारी बदलत गेली. 13 व्या दलाई लामाांनी किंग राजवंश असताना, तिबेटमधून चिनी सैनिकांना पळवून लावलं होतं. चिनी सैनिक निघून गेल्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी शासन केलं. 14 वे दलाई लामा आल्यानंतर तिबेटमध्ये चीनने वेगळा मोर्चा उघडला.
दलाई लामांनी तिबेट कधी सोडलं?
1960 साली चीनमध्ये तिबेटी आक्रमण सुरु झालं. त्यानंतर दलाई लामांना तिबेट सोडावं लागलं. भारतात धर्मशाळा येथे येऊन दलाई लामांनी निर्वासित सरकारची स्थापना केली. इथूनच ते बौद्ध धर्माचे अनुयायी आणि तिबेटी लोकांशी संवाद साधतात.
दलाई लामांच्या निवडीची प्रक्रिया काय?
दलाई लामाच्या नियुक्तीच जे प्रावधान आहे, त्यानुसार तिबेटमध्ये जन्मलेल्या त्या मुलाचा शोध घेतला जातो, ज्याचा आत्मा वर्तमान दलाई लामाशी मिळतो. अध्यात्मिक दृष्टीने होणारा हा शोध बरीच वर्ष सुरु असतो. यावेळी तिबेट शिवाय भारताच्या अन्य भागातून मुलांचा शोध घेतला जाऊ शकतो. असं झाल्यास 385 वर्षापासून सुरु असलेली परंपरा तुटू शकते. दलाई लामाची नियुक्ती योग्य नाही, असं चीनच म्हणणं आहे.
चीनची भूमिका काय?
चीनला आपल्या पद्धतीने नव्या दलाई लामांची नियुक्ती करायची आहे. आपण चीनचा भाग आहोत, हे तिबेटने जर स्वीकारलं, तर त्यांच्याशी या विषयावर बोलणं होऊ शकतं असं दलाई लामांच्या निवडीसंदर्भात चीनने म्हटलं होतं.
