AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला लाज वाटतेय… वडिलांच्या अंतिम संस्काराचा व्हिडिओ मागवणाऱ्या मुलींनी अखेर मागितली माफी

आयुष्यभर मुलींना संभाळणाऱ्या वडिलांनी वृद्धाश्रमात 20 दिवस आजाराशी दिला लढा पण शेवटी झाले निधन. पण तिन्ही मुली अंत्यसंस्काराला आल्याच नाहीत. मुलीने 5100 रुपये पाठवले म्हणत अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनाची जबाबदारीही वृद्धाश्रमाकडे सोपवली.

आम्हाला लाज वाटतेय... वडिलांच्या अंतिम संस्काराचा व्हिडिओ मागवणाऱ्या मुलींनी अखेर मागितली माफी
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Aug 12, 2026 | 7:14 PM
Share

हरियाणातील सोनीपत येथील एका वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले 74 वर्षीय शिवचरण रामरतन गुप्ता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांबाबतची हळवी घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराला त्यांच्या तिन्ही मुली उपस्थित राहू शकल्या नाहीत. इतकेच नाही तर नंतर त्यांनी वडिलांच्या अस्थींचे गंगेत विसर्जन करण्याची जबाबदारीही वृद्धाश्रम प्रशासनावर सोपवली. मात्र, आठ दिवसानंतर या मुलींनी अखेर माफी मागितली आहे.

वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी सांगितले की, शिवचरण गुप्ता गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होते. सुमारे 20 दिवसांपूर्वीच त्यांच्या तिन्ही मुलींना – नेपाळमध्ये राहणारी अनीता, उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहणारी निशा आणि मुंबईतील प्रिया – वडिलांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक अडचणीचे कारण देत तिघींपैकी एकीही वडिलांना भेटण्यासाठी सोनीपतला आली नाही.

वडिलांच्या अंत्यसंस्काराला देखील आल्या नाहीत तिन्ही मुली

पत्नीच्या निधनानंतर शिवचरण गुप्ता यांचा मुलींशी फोनवर होणारा संवाद हाच त्यांचा मोठा आधार होता. मात्र प्रकृती खालावत गेल्यानंतर हा संवादही कमी होत गेला. अखेर पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने तातडीने मुलींना माहिती दिली आणि त्या येणार असतील तर अंत्यसंस्कार थांबवण्याची तयारी दर्शवली. मात्र, तातडीने येणे शक्य नसल्याचे मुलींनी सांगितले. त्यामुळे वृद्धाश्रमाने व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना वडिलांचे अखेरचे दर्शन घडवले. शेकडो किलोमीटर दूर बसून तिन्ही मुलींनी संपूर्ण अंत्यसंस्काराची प्रक्रिया पाहिली. हा प्रसंग उपस्थितांसाठीही अत्यंत भावनिक ठरला.

मोठी मुलगी अनीता हिने ऑनलाइन 5100 रुपये पाठवत वडिलांचे अंत्यसंस्कार विधीवत आणि सन्मानाने करण्याची विनंती केली. त्यानंतर मुलींनी संपूर्ण अंत्यसंस्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही त्यांना पाठवण्याची विनंती केली.

वृद्धाश्रम प्रशासनाने पार पाडली सर्व जबाबदारी

सुरुवातीला मुलींनी वडिलांच्या अस्थी सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते, कारण नंतर येऊन त्या स्वतः गंगेत विसर्जन करतील अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही वेळाने पुन्हा फोन करून त्यांनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगत, अस्थी विसर्जनाची जबाबदारीही वृद्धाश्रमाकडे सोपवली. वृद्धाश्रम प्रशासनाने त्यांच्या इच्छेनुसार पुढील सर्व धार्मिक विधी करण्याची जबाबदारी स्वीकारली.

दरम्यान, शिवचरण गुप्ता यांनी हयातीत नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाच्या संमतीने त्यांचे नेत्रदान करण्यात आले असून, त्यामुळे दोन गरजू व्यक्तींना नवजीवनाची आशा मिळणार आहे.

आम्हाला लाज वाटतेय…

वडिलांच्या अस्थिविसर्जनासाठी न आलेल्या तिन्ही मुलींची अखेर आठ दिवसानंतर प्रतिक्रिया समोर आली आहे. या मुलींनी सोनीपतमधील वृद्धाश्रमवाल्यांशी संपर्क साधला आणि माफी मागितली. आम्हाला लाज वाटतेय, असं या मुली म्हणाल्या.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...