What India Thinks Today: वाढती आव्हाने, शेजाऱ्यांसोबतचे कटू संबंध, लष्कर किती मजबूत- या मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार चर्चा

'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'ची दुसरी आवृत्ती 25 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. TV9 नेटवर्कच्या या भव्य कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऊर्जा परिषदेतील 'ए ब्रेव्ह न्यू इंडिया' या सत्रात सहभागी होणार आहेत.

What India Thinks Today: वाढती आव्हाने, शेजाऱ्यांसोबतचे कटू संबंध, लष्कर किती मजबूत- या मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार चर्चा
राजनाथ सिंह
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2024 | 9:31 AM

नवी दिल्ली :  ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ (What India Thinks Today)  देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क TV 9 चा वार्षिक उत्सव पुन्हा एकदा आयोजित करण्यात आला आहे. ग्लोबल समिट सुरू होण्याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. इंडिया थिंक्स टुडे जगभरातील तज्ञांना एक व्यासपीठ प्रदान करते जिथे तज्ञ केवळ राजकारणच नव्हे तर चित्रपट, क्रीडा आणि अर्थव्यवस्थेच्या ज्वलंत समस्यांवर विचारमंथन करतात आणि त्यांचे मत व्यक्त करतात. ऊर्जा परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतासमोरील धोरणात्मक पातळीवरील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या तयारीवर आपले विचार मांडतील.

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ची दुसरी आवृत्ती 25 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. TV9 नेटवर्कच्या या भव्य कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ऊर्जा परिषदेतील ‘ए ब्रेव्ह न्यू इंडिया’ या सत्रात सहभागी होणार आहेत. या प्रतिष्ठित व्यासपीठाच्या माध्यमातून ते सीमेवर भारतासमोरील सततच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या तयारीबद्दल आपले मत मांडू शकतात.

भारताचे लष्कर किती आधुनिक ?

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लष्कराच्या आधुनिकीकरण आणि स्वदेशीकरणावर सातत्याने भर देत आहे. संरक्षण मंत्रीही या मुद्द्यावर काही महत्त्वाचे मुद्दे सर्वसामान्यांसमोर ठेवू शकतात. लढाऊ विमानांबाबत लष्कराची स्थिती काय आहे आणि इतर देशांशी कोणत्या प्रकारचे व्यवहार सुरू आहेत, याचीही माहिती ते देऊ शकतात. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानांना लष्कर कसे चोख प्रत्युत्तर देत आहे? तसेच, सरकार ज्या स्वदेशीकरणावर भर देत आहे, त्याचा लष्कराला कितपत फायदा झाला? या मुद्यांवर देखील प्रकाश टाकला जावू शकतो.

अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही होणार सहभागी

‘व्हॉट इंडिया थिंक टुडे’ या TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिटनंतर ‘सत्ता संमेलन’ आयोजित केले जाईल. कार्यक्रमाची सुरुवात TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या स्वागत भाषणाने होईल. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपले विचार मांडतील. ‘सत्ता संमेलन’मध्ये जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा केंद्रशासित प्रदेशातील बदलत्या परिस्थितीची माहिती देणार आहेत. गेल्या काही वर्षांत इथली परिस्थिती कशी बदलली आहे याबद्दल ते माहिती देतील.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री ‘सत्ता संमेलन’ व्यासपीठावर सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपापल्या पक्षांच्या रणनीतीवर चर्चा करू शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता होईल.