Delhi Exit Polls 2025 : अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका, दिल्लीत भाजपची सत्ता; 25 वर्षानंतर कमबॅक
दिल्लीत मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे.

Delhi Exit Polls 2025 : नवी दिल्लीत आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. दिल्लीत एकूण 1 कोटी 56 लाख मतदार आहेत. दिल्लीतील मतदान पार पडल्यानंतर आता लगेचच एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. तर भाजपचे पुन्हा सत्तेत कमबॅक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आला आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हातातून सत्ता जाताना दिसत आहे. तब्बल 25 वर्षानंतर भाजपला दिल्लीच्या सत्तेत कॅमबॅक मिळत आहे. तर केजरीवाल यांना 10 वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावं लागणार असून हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडताच विविध एजन्सींचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार दिल्लीत आपला मोठा झटका बसताना दिसत आहे. तर भाजप सत्तेत येताना दिसत आहे.
डीव्ही रिसर्चच्या सर्व्हेत आपला 26 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 36 ते 44 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेस खातंही उघडणार नसल्याचा हा पोल सांगत आहे. तर, चाणक्याच्या पोलमध्ये भाजपला 39 ते 44 आणि आपला 25 ते 28 जागा मिळताना दिसत आहे. काँग्रेसला मात्र फक्त दोन ते तीन जागा मिळतील असा अंदाज आहे.
कुणाच्या पोलमध्ये काय?
💠पीपल्स इन्साइट
- आप – 25-29
- भाजप- 40-44
- काँग्रेस – 0 – 1
💠मार्टिज
- आप – 32 -37
- भाजप- 35 – 40
- काँग्रेस – 0-1
💠पोल डायरी
- आप – 18 -25
- भाजप- 42-50
- काँग्रेस – 0-2
💠जेव्हीसी पोल
- आप – 22-31
- भाजप- 39-45
- काँग्रेस – 0-2
💠पी एमएआरक्यू
- आप – 21-31
- भाजप – 39-49
- काँग्रेस – 0-1
💠पीपल्स प्लस
- आप – 10-19
- भाजप – 51-60
- काँग्रेस – 0