Delhi Blast : नोकरी सोडली, नेत्र शल्यविशारद पतीला तलाक, दहशतवाद्यांच्या संपर्कात अशी आली डॉ. शाहीन, जाणून घ्या ए टू झेड कहाणी
Lal Kila Blast : जैश-ए-मोहम्मदची महिला गटाच्या संपर्कात असलेल्या डॉ. शाहीन सईद हिला फरीदाबादमधून अटक करण्यात आली. ती GSVM मेडिकल कॉलेजमधील फार्माकोलॉजी विभागात सात वर्षांपासून काम करत होती. नंतर ती अचानक गायब झाली. तर थेट आता ती वेगळ्याच रुपात समोर आली.

दिल्ली बॉम्बस्फोटात पोलिस आणि तपास यंत्रणांनी जी महत्त्वाची दहशतवादी पकडले. त्यात जैश-ए-मोहम्मदची महिला गटाच्या संपर्कात असलेल्या डॉ. शाहीन सईद हिचाही समावेश आहे. तिला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. ती GSVM मेडिकल कॉलेजमधील फार्माकोलॉजी विभागात सात वर्षांपासून काम करत होती. 2013 मध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता तिने कॉलेजमध्ये येणे बंद केले. ती अचानक गायब झाली. 2021 मध्ये तिला निलंबित करण्यात आले. तर थेट आता ती वेगळ्याच रुपात समोर आली.
जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार, डॉ. शाहीन ने प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजमधून जानेवारी 2003 मध्ये एमबीबीएस आणि डिसेंबर 2005 मध्ये एमडी केली. त्यानंतर लोकसेवा आयोगामार्फत तिची निवड झाली. ऑगस्ट 2006 मध्ये जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये फार्माकोलॉजी विभागात ती रुजू झाली. त्यानंतर वर्ष 2009-10 मध्ये कन्नौज मेडिकल कॉलेजमध्ये तिची बदली झाली. तर सहा महिन्यांनी ती पुन्हा जीएसव्हीएम कॉलेजमध्ये परतली.
पुढे वर्ष 2013 मध्ये ती कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरी सोडून गेली. मेडिकल कॉलजने तिला वारंवार नोटीस पाठवली. पण तिने कोणतीही प्रतिक्रिया, उत्तर दिले नाही. त्यानंतर तिच्यावर कार्यवाही करण्यात आली. सरकारने वर्ष 2021 मध्ये तिला नोकरीवरून कमी केले. या कारवाईनंतर शाहीन हिने अनुभव प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. यावेळी तिने डॉ. परवेज सईद, असिस्टेंट प्रोफेसर, मेडिसिन विभाग, ओपीडी कॉम्प्लेक्स इंटिग्रल युनिव्हर्सिटी, दसोली, कुर्सी रोड, लखनऊ असा पत्ता दिला होता. शाहीनचे लखनऊ येथील लालबाग गर्ल्स इंटर कॉलेजमधून शिक्षण झाले. तिचा पती नेत्र शल्यविशारद होता. त्यांचे नाव डॉ. हयात जफर असे आहे. वर्ष 2015 मध्ये तलाकद्वारे दोघेही वेगळे झाले.
शाहीन अभ्यासात हुशार
स्थानिक नागरिकांच्या मते शाहीन ही अभ्यासात हुशार होती. तिला लोकांची सेवा करायची होती. ती यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात अथवा कटात सहभागी नव्हती. काही लोकांनी तिचा ब्रेन वॉश केल्याची माहिती दिली. स्थानिक लोकांना ती अशा काही कटात सहभागी असेल असे वाटत नाही. स्थानिकांच्या मते शाहीन ही काही दिवस दिल्लीतही राहिली होती.
परवेजच्या संपर्कात, मग अटक
परवेज याचे सहारनपूर येथे क्लिनिक होते. त्याच्याशी शाहीन संपर्कात आली. ती त्याच्या कशी संपर्कात आली. ती दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलच्या कधी संपर्कात आली याचा उलगडा झालेला नाही. पण परवेज सोबत ती अनेक दिवसांपासून संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 6 नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सहारनपूर येथील डॉ. आदिल अहमद याला अटक केली होती. त्यापूर्वीपासूनच सहारनपूर कनेक्शन आणि फरीदाबाद कनेक्शन पोलिसांच्या रडारवर आले होते. डॉ. मुजम्मिल याच्या चौकशीदरम्यान शाहीनचे नाव सर्वात अगोदर समोर आले होते.
