AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पाया पडला, नंतर पाण्यात दाबून धरले… पित्यानेच चंबळ नदीत मुलीला… दिल्ली हादरली

Father Kills Daughter : अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी तिला ठार मारल्याचे समोर आले आहे.

आधी पाया पडला, नंतर पाण्यात दाबून धरले... पित्यानेच चंबळ नदीत मुलीला... दिल्ली हादरली
Father Kills DaughterImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 07, 2026 | 9:48 PM
Share

राजधानी दिल्लीतून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. 18 वर्षीय अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी तिला आग्राजवळील चंबळ नदीत बुडवून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखपत सिंह असे आरोपीचे नाव असून त्याला आणि त्याच्या एका नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरूवात केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीत आई-वडिलांसोबत राहणारी ही 18 वर्षीय अविवाहित तरुणी सुमारे तीन महिन्यांची गर्भवती होती. लग्नाआधीच गर्भवती राहिल्याने सामाजिक बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांच्या तळपायाचा राग मस्तकात गेला. त्यांनी नातेवाईकासोबत तिच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर मुलीला आग्र्यातील बसोनीजवळील चंबळ नदीच्या काठावर नेऊन जाणूनबुजून पाण्यात बुडवून ठार मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

उपचाराच्या बहाण्याने आग्र्याला नेले

चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना सांगितले की, 28 जुलै रोजी उपचारासाठी नेण्याच्या बहाण्याने त्यांनी तरुणीला आग्र्याला नेले. तेथे एका नातेवाईकाच्या घरी रात्र घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला चंबळ नदीकाठी नेण्यात आले. यावेळी त्यांनी तरुणीला स्वतः नदीत उडी मारण्यास सांगितले. मात्र तिने नकार दिला. यानंतर वडिल तिच्या पाया पडले आणि तिला जबरदस्तीने पाण्यात नेऊन तिचे डोके पाण्याखाली दाबून ठेवले. ती बुडाल्यानंतर हात जोडून तिची माफीही मागितली, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

शेजाऱ्याच्या संशयामुळे उघड झाला प्रकार

पोलिसांनी सांगितले की, 31 जुलै रोजी आरोपी दिल्लीत परतल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना मुलगी नैराश्यात होती आणि उपचारासाठी आग्र्याला नेले होते, असे सांगितले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने आग्र्यातच अंत्यसंस्कार केल्याचा दावा त्याने केला. मात्र, त्याच्या या विधानामुळे संशय आल्याने एका शेजाऱ्याने पोलिसांना माहिती दिली.

मोबाईल लोकेशन आणि फोटो महत्त्वाचे पुरावे

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर आरोपीने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींविरुद्ध तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. एका मोबाईलमधून वडील आणि मुलगी नदीत एकत्र असल्याचे अनेक फोटो मिळाले आहेत. तसेच, पीडित तरुणी आणि दोन्ही आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून तिघेही आग्र्याला गेले असल्याची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...